मातंग साहित्य परिषदेच्या वतीने निगडी येथे परिसंवादाचे रविवारी होणार आयोजन
स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक चळवळीतील विचारसूत्रे या विषयावर निगडी येथे परिसंवाद


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मातंग साहित्य परिषद -पुणे ,स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ -निगडी,समरसता गतीविधी-पिंपरी-चिंचवड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी दि.९ मार्च २०२५ सायं. ६.३० वा कॅप्टन जी.एस.कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, -निगडी येथे .”स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक चळवळीतील विचारसूत्रे”या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे.


या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीशजी प्रभुणे हे असणार आहेत. तर या परिसंवादात केंद्रीय भटके विमुक्त आयोगचे माजी अध्यक्ष: पद्मश्री दादा इदाते, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार प्रदीपदादा रावत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू व सुप्रसिध्द वक्ते सात्यकी सावरकर हे मार्गदर्शन करणार आहेत. सामाजिक समरसतेचे मूल्य समाजात रुजवण्याकामी हा परिसंवाद अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अशी माहिती सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष रमेशजी बनगोंडे आणि समरसता गतीविधीचे संयोजक सोपान कुलकर्णी यांनी दिली आहे.तरी पिंपरी-चिंचवड, पुणे व लगतच्या सर्व अबालवृद्धांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ धनंजय भिसे यांच्याद्वारे करण्यात आले आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.











