पुणे लॉयर्स कंज्युमर्स् सोसायटीने जाणून घेतल्या वकिलांच्या समस्या


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज पिंपरी न्यायालयातील पुरुष बार रूम येथे दि पुणे लॉयर्स कंज्युमर्स् को- ऑप. सोसायटीच्या चेअरमन व संचालक मंडळाने भेट देत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वकिलांच्या समस्या जाणून घेतल्या. लॉयर्स कंज्युमर्स् को- ऑप. सोसायटीची स्थापना १९६१ मध्ये झालेली असून वकिलांसाठी विविध सुविधा अल्पदरात या सोसायटीमार्फत पुरवल्या जात असून देशातील वकिलांसाठी काम करणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून नावाजलेली आहे.


यावेळी उपस्थित वकिलांनी सोसायटीमार्फत ऑनलाइन पेमेंट ची सुविधा, वकिलांसाठी वेगळी रांग, मुबलक स्टॅम्प पुरवठा, मनुष्यबळ वाढवणे, ई फाइलिंग अशा विविध समस्या व सूचना संचालक मंडळापुढे मांडल्या. यावेळी सोसायटीचे विद्यमान चेअरमन ॲड. हेमंत गुंड यांनी वरील सर्व समस्या पुढील काही दिवसांमध्ये मार्गी लावल्या जातील असे आश्वासन उपस्थित वकिलांना दिले. लॉयर्स कंज्युमर्स् को- ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळातील मा. चेअरमन ॲड. सत्यजित तुपे पाटील, संचालक ॲड. रेखाताई करंडे, ॲड. आलोक गायकवाड, ॲड. सुनील बहिरट, ॲड. विकास कांबळे, ॲड. मनीष मगर, तज्ञ संचालक ॲड. राजेश पुणेकर हे उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी उपस्थित चेअरमन व संचालक मंडळाने समस्या आणि सूचना जाणून घेण्यासाठी वेळ देऊन त्यावर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल आभार मानले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ, ॲड. किरण पवार, ॲड. मदनलाल छाजेड, ॲड. सुशील मंचरकर, माजी उपाध्यक्ष ॲड. योगेश थंबा, ॲड. अतुल अडसरे, मा. सचिव ॲड. धनंजय कोकणे, ज ॲड. मेरी रणभिसे, ॲड. अनिल शिंदे, ॲड. फारुक शेख, ॲड. महेश वाकळे, ॲड. संभाजी बवले यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित,, ॲड. विकास शर्मा, ॲड. संघर्ष सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले.










