- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांचे हक्क, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन या क्षेत्रांत भरीव कार्य करताना, आरंभ सोशल फाउंडेशन महिलांना पुढे जाण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला समान संधी मिळवावी आणि आपला विकास साधावा, हा संस्थेचा मूलमंत्र आहे.या महिला दिनी, “सबला ते सक्षम” हा प्रवास साजरा करूया आणि प्रत्येक महिलेला तिच्या सामर्थ्याची जाणीव करून देऊया!समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी २०१५ साली मोरवाडी, पिंपरी येथे आरंभ सोशल फाउंडेशन ची स्थापना झाली. सामाजिक, नैसर्गिक आणि आर्थिक विकासाच्या व्यापक उद्देशाने कार्यरत असलेली ही संस्था समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. संस्थेची पार्श्वभूमी सांगताना सोनाली तुषार हिंगे म्हणाल्या , आपल्या सभोवतालच्या …
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. आधुनिक स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज अधिकाधिक वाढत आहे. या गरजेला ओळखून सांगवी परिसरात शिक्षणाचा उजाळा देणारी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारी संस्था म्हणजे अरविंद एज्युकेशन सोसायटी. सन १९९२ साली स्वर्गीय महापौर नानासाहेब शितोळे यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, तर अध्यक्षा आरती राव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था आजही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वसा जपत आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञानासोबतच मूल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या या संस्थेने सांगवी परिसरात शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. सुरुवातीला संस्था अवघ्या वीस विद्यार्थ्यांनी सुरुवात झाली त्या छोट्या रोपट्याचं आज मोठ्या वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेला आहे. या वटवृक्षाच्या *भारतीय विद्यानिकेतन…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र व्यापक प्रमाणात असल्याने ग्रामस्तरावर कार्यालयाच्या कामकाजाच्या स्वरुपाची माहिती पोहोचावी, या उद्देशाने प्रथमच दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीची यंत्रणा ग्रामस्तरावर पोहोचणार आहे. या दिनदर्शिकेतून पीएमआरडीएची रचना, कार्यप्रणाली, याबाबत माहिती दिल्याने स्थानिक पातळीवर नागरिकांना ती उपयुक्त ठरणार आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या माहितीयुक्त दिनदर्शिकेचे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयांसह यंत्रणेस वितरण करण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सप्तसुत्री कार्यप्रणाली निश्चित केली असून त्यानुसार प्राधिकरणात कार्यवाही सुरू आहे. पीएमआरडीएचे कामकाज गतिमान, पारदर्शक आणि नागरिकांची अधिकाधिक कामे ऑनलाइन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे. पीएमआरडीएच्या कामकाजाबद्दल व्यापक स्वरूपात…
मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा भाजप आणि संघाचे षडयंत्र – माजी आमदार गौतम चाबुकस्वार पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात सध्या कोणीही उठतो आणि महाराष्ट्रातील थोर महापुरुष आणि मराठी भाषेविषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य करतो. असा अपमान होत असतानाही राज्यातील भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाचे सरकार गप्प का आहे? आपली मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या त्या प्रत्येक हुतात्म्यांचा अपमान हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक जाणूनबुजून करीत आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे. घाटकोपर येथे एका कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी यांनी मुंबईच्या विविधतेतील एकतेवर भाष्य केले होते. ‘मुंबईत…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ! राष्ट्रासाठी रक्तदान, स्त्रियांच्या सन्मानासाठी रक्तदान, गरजूंसाठी रक्तदान!’ या संकल्पनेला पुढे नेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे रक्तदान शिबिर रसिकलाल एम. धारीवाल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड व संगवी केसरी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज व रसिकलाल एम. धारीवाल कॉलेज ऑफ फार्मसी, टेल्को रोड, चिंचवड स्टेशन येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिराचे मुख्य समन्वयक नाते रक्ताचे संस्थेचे राम बांगड आहेत. शिबिरात ससून ब्लड बँक, यशवंतराव चव्हाण ब्लड बँक, केईएम…
सक्षम पिढी घडवायची असेल तर त्यांचे नाते निसर्गाशी दृढ करणे आवश्यक – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणाची जाणीव निर्माण व्हावी,शहरात पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने महापालिकेच्या वतीने २८ वर्षांपासून रानजाई महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. विशेषतः युवा पिढीने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. यामुळे त्यांना विविध वनस्पती, वृक्ष, फळे व फुलांची माहिती तर मिळेलच शिवाय जैवविविधतेचे महत्व कळेल आणि त्यांच्यामध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव देखील निर्माण होईल, भविष्यासाठी सक्षम पिढी घडवायची असेल तर त्यांचे नाते निसर्गाशी दृढ करणेही तितकेच आवश्यक आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने रानजाई महोत्सव’ व २८ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक) पहिला वाहन-मुक्त दिवस साजरा करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. उपक्रमाचे उद्घाटन सकाळी ८ वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. यामध्ये महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदानही खूपच महत्त्वाचे असून शहरातील ३२ प्रभागात कायमस्वरूपी ४५२ महिला स्वच्छता कर्मचारी कार्यरत असतात. जागतिक महिला दिन (८ मार्च) शनिवारी सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे. जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जाते. पिंपरी चिंचवड शहरामध्येही तब्बल ४५२ महिला स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी कार्यरत असून महिला दिनीही त्यांचे कौतुक करावे लागेल. कारण या महिलांमुळेच आपले शहर स्वच्छ…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ८ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत महिलांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमास सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम…
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड-थेरगाव दरम्यानच्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहारावर आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सदर पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित ठेकेदार, सल्लागार आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. २०१७ मध्ये २८.७१ कोटींच्या निविदेने कामाला सुरुवात थेरगाव येथील प्रसून धाम हाउसिंग सोसायटीजवळून चिंचवड-थेरगाव जोडणाऱ्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामासाठी २०१७ साली धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला २८ कोटी ७१ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे ही निविदा मूळ अंदाजपत्रकाच्या १४% अधिक दराने मंजूर करण्यात आली होती. वेळेवर काम न झाल्याने दोनदा मुदतवाढ मूळ निविदेनुसार ठेकेदाराला १८ महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक…
