श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ! राष्ट्रासाठी रक्तदान, स्त्रियांच्या सन्मानासाठी रक्तदान, गरजूंसाठी रक्तदान!’ या संकल्पनेला पुढे नेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.


हे रक्तदान शिबिर रसिकलाल एम. धारीवाल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड व संगवी केसरी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज व रसिकलाल एम. धारीवाल कॉलेज ऑफ फार्मसी, टेल्को रोड, चिंचवड स्टेशन येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिराचे मुख्य समन्वयक नाते रक्ताचे संस्थेचे राम बांगड आहेत. शिबिरात ससून ब्लड बँक, यशवंतराव चव्हाण ब्लड बँक, केईएम हॉस्पिटल ब्लड बँक, मोरया ब्लड बँक, जहांगीर ब्लड बँक, बीड ब्लड बँक, औंध ब्लड बँक, भोसरी ब्लड बँक व इतर अनेक ब्लड बॅकांचा सहभाग असणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड, खजिनदार प्रकाशचंद्र चोपडा, जनरल सेक्रेटरी ॲड. राजेंद्रकुमार मुथा, जॉईंट सेक्रेटरी राजेशकुमार संकला व प्रा. अनिलकुमार कांकरिया, विश्वस्त सतीश चोपडा, शांतीलाल कटारिया, प्रवीण लुंकड, वालचंद संचेती, देविदास भन्साळी, प्रकाशलाल बंबजी, डॉ. लोढा आदींच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न होणार आहे.










