जागतिक महिला दिन विशेष – “एक संकल्प, एक ध्येय – सोनाली तुषार हिंगे यांचा समाजासाठी आरंभ”


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांचे हक्क, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन या क्षेत्रांत भरीव कार्य करताना, आरंभ सोशल फाउंडेशन महिलांना पुढे जाण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला समान संधी मिळवावी आणि आपला विकास साधावा, हा संस्थेचा मूलमंत्र आहे.या महिला दिनी, “सबला ते सक्षम” हा प्रवास साजरा करूया आणि प्रत्येक महिलेला तिच्या सामर्थ्याची जाणीव करून देऊया!समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी २०१५ साली मोरवाडी, पिंपरी येथे आरंभ सोशल फाउंडेशन ची स्थापना झाली. सामाजिक, नैसर्गिक आणि आर्थिक विकासाच्या व्यापक उद्देशाने कार्यरत असलेली ही संस्था समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.


संस्थेची पार्श्वभूमी सांगताना सोनाली तुषार हिंगे म्हणाल्या , आपल्या सभोवतालच्या सामाजिक, नैसर्गिक तसेच सामाजिक घटकांच्यासर्वांगीण विकास साधण्याच्या व्यापक हेतूने स्थापना करण्यात आली.
आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून परिसरामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम नियमितपणे राबवण्यात येत आहेत. संस्थेचेध्येय ही विशिष्ठ समुदायापूरते मर्यादित न ठेवता सर्व घटकांना समावेशक धोरणे आखून विकास घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आरंभसोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत. यातील काही सामाजिक उपक्रम अधोरेखित करतआहोत. रेणुकादेवी प्राथमिकविद्यामंदिर ही मराठी माध्यमाची शाळा मोरवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये भरवण्यात येतअसे.हि जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागी शाळेची स्वतंत्र्य सर्व सोई युक्तबांधकाम करण्यात आले आहे या शाळेमध्ये सुमारे ४००-४५० विद्यार्थी मोफत व दर्जेदारशिक्षण घेत असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातूनविविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव भेटावायासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करनेत येते तसेच तालुका ,जिल्हा स्तरावरीलस्पर्धांमध्ये सहभागी होता यावे त्यांना प्रोत्साहन व आर्थिक मदत ही आरंभ सोशल फाउंडेशनकरते. कोरोना च्या काळामध्ये आरंभसोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना वैधकीय किट वाटप, तसेच मास्क सॅनिटायजर वऔषधी मोफत उपलब्ध करून दिले, तसेच सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसिकरणशिबिराचे आयोजन करून सर्वाना लसिकरणाचा लाभ मिळवून दिला. तसेच मोफत अन्नदान व शिधा वाटप करण्यात आले.तसेच कोरोना बाधितांना उपचारासाठी बेडउपलब्ध करून देणे तसेच कोरोना जाणीव जागृती प्रबोधनपर कार्यक्रम आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यातआले. छत्रपती श्री.संभाजी महाराजयांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य रक्तदानशिबिर आयोजित केले जाते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसादलाभला आहे. या शिबिरावेळी किमान २००-२५० रक्त संकलित होत असते. यावेळी सहभाग घेणाऱ्या रक्तदात्यानाभेटवस्तू ही आरंभ सोशल फाउंडेशन कडून दिल्या जातात. महिलांसाठी बचत गटाच्यामाध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मिती साठी पालिकेच्या माध्यमातून किंवा इतर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण वमार्गदर्शन शिबिर आरंभ सोशल फाउंडेशन च्या वतीने आयोजित केले जाते. तसेच महिला बचतगटाला पालिकेच्या वतीने अर्थसहाय्य केलेजाते त्याबाबत महिलांना कागदपत्राची पूर्तता व अर्ज भरून दिले जातात तसेचअर्थसहाय्य प्राप्त होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करून लाभ मिळवून देण्याचे महत्वाचेकाम आरंभ सोशल फाउंडेशनच्या वतीने नियमित चालू आहे.

आज प्रभागात सुमारे १२० पालिकानोंदणीकृत बचत गट सक्रियपणे कार्यरत आहेत. जेष्ठ नागरिकांना हक्काचेव्यासपीठ म्हणून प्रभागात जेष्ठ नागरिकविरंगुळा केंद्र निर्मिती केली आहे. आज प्रभागात सुमारे १२-१५ जेष्ठ नागरिकविरंगुळा केंद्र कार्यरत आहेत. त्यांना लागणाऱ्या टेबल खुर्ची तसेच कपाटे ,साऊंडसिस्टम असेल अथवा कॅरम बोर्ड दैनिक वर्तमानपत्रेआपल्या माध्यमातून दिले जातात. दहावी व बारावी मधीलविद्यार्थ्यांसाठी दरवर्षी गुणगौरव समारंभआयोजित करण्यात येतो प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शैक्षणिक साहित्य वाटप व व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेजाते.










