Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी-चिंचवड अप्‍पर तहसिलदारांना निवेदन पत्रकार तुषार खरात यांची अटक रद्द करून गुन्‍हे मागे घेण्याची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यसरकारकडून माध्यमांवरील वाढता दबाव, सोशल मीडियात पत्रकारांना केले जाणारे ट्रोलिंग तसेच पत्रकार तुषार खरात यांना झालेल्‍या अटकेचा पिंपरी-चिंचवड शहरातील माध्यम प्रतिनिधींनी निषेध व्‍यक्‍त केला आहे. पिंपरी-चिंचवड अप्‍पर तहसिलदार जयराज देशमुख यांना दिलेल्‍या निवेदनात ही मागणी करण्यात आली. खरात यांची अटक रद्द करून, गुन्‍हे मागे घ्यावेत. तसेच पत्रकारांना ट्रोल करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई व्‍हावी, अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. निगडी येथील फ क्षेत्रीय कार्यालयातील पिंपरी-चिंचवड अप्‍पर तहसिलदारांना शहरातील विविध प्रमूख माध्यमातील, युट्यूब आणि वेबपोर्टलच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. या वेळी दिलेल्‍या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन इंटर झोनल (राज्यस्तरीय स्पर्धा) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) मधील मुलांच्या संघाला उपविजेता क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ही स्पर्धा ग्रामीण पॉलीटेक्निक नांदेड येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रमोद वैद्य, प्रकाश सोनवणे, प्रसाद मोरे, सोहम गवळी व आदेश ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत पीसीपीच्या दिनेश फड या विद्यार्थ्याने लांब उडी आणि तिहेरी उडी यामध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. राजगड पॉलिटेक्निक, भोर येथे ३ मार्च रोजी झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्रेयस काकडे त्या…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिलादिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍या उषा गर्भे आणि नीलम तुपे यांचा ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ यांच्या हस्ते विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे हृद्य सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, कार्यवाह राजाराम गावडे, संचालक नंदकुमार मुरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि त्रिवार ओंकार करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून स्त्रीशक्तीला वंदन करून ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडच्या माध्यमातून चालणाऱ्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतातील महिलांबरोबरच अडचणीत असलेल्या सर्वांसाठी, समुपदेशनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मनीषा बाजीराव सातपुते या युवतीला जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका आशा नेगी यांच्या हस्ते बेस्ट लाइफ कोच अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ‘पहचान स्त्री शक्ती की’ या संस्थेमार्फत ‘विमेन एम्पॉवरमेंट अवॉर्ड २०२५’ या उपक्रमांतर्गत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे या संस्थेच्या सभागृहात हा सन्मान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आशा नेगी यांनी स्वतःला झालेल्या गंभीर अवस्थेतील स्तनाच्या कर्करोगावर (ब्रेस्ट कॅन्सर) कशाप्रकारे यशस्वी मात केली याविषयी स्वानुभव कथन करताना, ‘ताणतणाव हे कोणत्याही विकारावरील प्रमुख कारण असून आजार कितीही गंभीर स्वरूपाचा असलातरी सकारात्मक दृष्टिकोन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गृहनिर्माण सोसायटी, शाळा, धार्मिक स्थळे, हॉस्पिटल यासह रविवाशी क्षेत्रात वाईन शॉप, बीअर शॉप, बार आणि रेस्टॉरंट परवानगी देताना सोसायटीची ‘एनओसी’ बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी सोसायटींच्या आवारामध्ये लिकर शॉपला परवानगी दिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर सभागृहात चर्चा झाली. आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये विविध गृहप्रकल्प आहेत. त्यामधील कमर्शिअल दुकानांमध्ये लिकर शॉपचे परवाने दिले जातत. सोसायटींच्या आवारामध्ये लिकर शॉप असल्यामुळे विद्यार्थी, माता-भगिनी,…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड पालिकेच्या बालवाड्यांमध्ये शिक्षणाचा अनुभव अधिक प्रभावी आणि समृद्ध करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये शिक्षिकांनी बनवलेली हस्तपुस्तिका, बालवाडी शिक्षिकांसाठी विशेष कार्यशाळा, मास्टर ट्रेनर निवड, आणि क्लस्टर मिटिंग्सच्या माध्यमातून बालवाडी शिक्षणात एकसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बालवाडी वर्गांसाठी शिक्षिकांनी शिक्षिकांसाठी बनवलेली हस्तपुस्तिका हा महत्वाकांक्षी उपक्रम ठरत आहे. दोन वर्षांपुर्वी बालवाडी समन्वयकांशी चर्चा करून शिक्षिकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये तीन विभागांमधून ५० शिक्षिकांचा संघ तयार झाला. विविध संस्थांच्या आणि अभ्यासक्रमांच्या मदतीने बालवाडी शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी या शिक्षिकांनी प्रयत्न सुरू केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत कार्य करणाऱ्या संस्था आणि आकांक्षा फाउंडेशनच्या अभ्यासक्रम टीमसोबत चर्चा करून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र. २ बोऱ्हाडेवाडी, मोशी प्राधिकरण येथील पेठ क्र. ५ आणि ८ येथील ताब्यात आलेल्या जागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुट उंच पुतळा उभारण्याच्या विषयासह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये एसइइ लर्निंग प्रकल्प राबविण्यासाठी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्ट्ररनेटिव्स लडाख येथे अभ्यासदौरा आयोजित करण्याबाबतच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या स्थायी समिती सभेत अतिरिक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष व आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड शहरात आज (मंगळवारी) एकूण १८ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून ही रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये तब्बल १,१४० नागरिकांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वराज्य व धर्मरक्षणासाठी लढा दिला. त्यांनी अतोनात छळ, हालअपेष्टा सहन केल्या. त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्याची संकल्पना आमदार शंकर जगताप यांनी मांडली आणि शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ती उचलून धरली. या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना…

Read More

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त पाच फूट उंच आणि ३० फुटांचा घेर असलेली पगडी तुकोबाचरणी अर्पण करण्यात आली. ही जगातील सर्वांत मोठी पगडी असल्याचा दावा केला जात आहे. याची दखल वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया आणि जीनियस बुकने घेतली आहे. तुकोबाचरणी ही पगडी अर्पण करण्यात आली असून, देहू देवस्थानाकडूनही या भल्यामोठ्या पगडीचे कौतुक करण्यात आले. पिंपरी चिंचवड मधील दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने ही पगडी आज देहू देवस्थानला सुपूर्त केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीजनिमित्त दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांनी तुकोबांच्या मंदिरात भलीमोठी पगडी भेट दिली आहे. ही पगडी पाहण्यासाठी तुकोबांच्या मुख्य मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. या पगडीचे आज…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा मेल आज सकाळी साडेआठच्या सुमारास कॉलेज प्रशासनाला मिळाला, त्यानंतर तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याची तातडीने दखल घेत मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा कॉलेजमध्ये पाठवण्यात आला. बॉम्ब शोधक/नाशक पथक (BDDS) आणि श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण कॉलेजची कसून झडती घेतली. मात्र, पाच ते सहा तास तपास केल्यानंतर हा ई-मेल पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले. बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल मिळताच पोलिसांनी जलद गतीने कारवाई केली. अचानक पोलिसांचा मोठा ताफा कॉलेजमध्ये पोहोचल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण कॉलेज रिकामे करण्याचे आदेश…

Read More