ताज्या घडामोडीपिंपरी

मनीषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतातील महिलांबरोबरच अडचणीत असलेल्या सर्वांसाठी, समुपदेशनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मनीषा बाजीराव सातपुते या युवतीला जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका आशा नेगी यांच्या हस्ते बेस्ट लाइफ कोच अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ‘पहचान स्त्री शक्ती की’ या संस्थेमार्फत ‘विमेन एम्पॉवरमेंट अवॉर्ड २०२५’ या उपक्रमांतर्गत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे या संस्थेच्या सभागृहात हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी आशा नेगी यांनी स्वतःला झालेल्या गंभीर अवस्थेतील स्तनाच्या कर्करोगावर (ब्रेस्ट कॅन्सर) कशाप्रकारे यशस्वी मात केली याविषयी स्वानुभव कथन करताना, ‘ताणतणाव हे कोणत्याही विकारावरील प्रमुख कारण असून आजार कितीही गंभीर स्वरूपाचा असलातरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर त्यातून निश्चितच बरे होता येते. विकारांबाबत कोणालाही दोष न देता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात जगा!’ असा संदेश देत मनीषा सातपुते यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.

जीवनामध्ये प्रत्येक माणसाला हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य या अडचणी असतात किंवा यापैकी कोणतीतरी एखादी अडचण असू शकते. यातून बाहेर पडण्यासाठी मनीषा सातपुते या हीलिंग व लाईफ कोचिंगद्वारे मार्गदर्शन करतात. ‘पहचान स्त्री शक्ती की’ या संस्थेच्या संस्थापक – अध्यक्षा प्राची बोरकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेमार्फत महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या पदाधिकारी महिलांनी संयोजनात परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button