राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत पीसीपीचे घवघवीत यश


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन इंटर झोनल (राज्यस्तरीय स्पर्धा) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) मधील मुलांच्या संघाला उपविजेता क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ही स्पर्धा ग्रामीण पॉलीटेक्निक नांदेड येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रमोद वैद्य, प्रकाश सोनवणे, प्रसाद मोरे, सोहम गवळी व आदेश ठाकरे यांनी सहभाग घेतला होता.


समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत पीसीपीच्या दिनेश फड या विद्यार्थ्याने लांब उडी आणि तिहेरी उडी यामध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
राजगड पॉलिटेक्निक, भोर येथे ३ मार्च रोजी झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्रेयस काकडे त्या विद्यार्थ्याने उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धांना प्राचार्य डॉ. विद्या बॅकोड, यशस्वी विद्यार्थी व संघ व्यवस्थापक प्रा. संपत ननवरे, राजू गायकवाड, मारुती गायकवाड, राहुल चव्हाण, अतुल सालवे, किशोर गव्हाणे, लक्ष्मी थरकुडे, क्रीडा समन्वयक सुनील जगताप आदी उपस्थित होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.










