मला आमदार किंवा खासदार व्हायचं नाही पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार – पार्थ पवार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराध्यक्ष पदाबाबत अजित पवार हे अंतिम निर्णय घेतील. शहराला राज्यपाल नियुक्त आमदार मिळावा ही माझी इच्छा आहे. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा पूर्वीचा बालेकिल्ला आहे. मला आमदार किंवा खासदार व्हायचं नाही. पक्षवाढीसाठी प्रयत्न करत राहणार आहे असे युवा नेते पार्थ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये युवा नेते पार्थ पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक मयूर कलाटे, निलेश पांढारकर, फजल शेख, शेखर काटे, गोरक्ष लोखंडे, विजय लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पार्थ पवार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभेतून विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील. तसेच चिंचवड विधानसभेच्या जागेवर आम्ही दावा करणार आहोत. या मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. पिंपरी- चिंचवड शहरात आधीपासूनच मी सक्रिय होतो. पक्षाचे अनेक जण सोडून गेले आहेत. लोक आपल्या सोबत आहेत की नाही, याची पाहणी करतो आहे,