
पिं-चिं भुलतज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ छाया सूर्यवंशी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या भूलतज्ञ विभाग प्रमुख डॉ. छाया सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. आकुर्डी येथे संपन्न झालेल्या पदग्रहण कार्यक्रमात अध्यक्ष पदाची सूत्रे मावळते अध्यक्ष डॉ.उमा देशमुख यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. छाया सूर्यवंशी यांच्याकडे सोपवली. सचिवपदी डॉ. भाविनी शहा, सह सचिव मनीषा सपाटे, उपाध्यक्षपदी डॉ दीपक शिंदे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी डॉ. सीमा सूर्यवंशी तर खजिनदार डॉ. मयुरेश उमाळकर यांची, सहखजिनदार पदी डॉ. सचिन वाघ यांची निवड करण्यात आली.डॉ. मनीषा सपाटे यांनी ‘पल्स बुलेटिन’च्या मुख्य संपादकाचा कार्यभार डॉ. आशिष पाटणी यांच्याकडे सोपवला.
यावेळी महाराष्ट्र भूलशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश तगडपले, माजी उपाध्यक्ष डॉ. विकास कर्णे, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुमित लाड,सचिव डॉ. माया भालेराव, संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ शोभा व्हटकर,डॉ. शुभांगी कोठारी, डॉ. रत्नदीप मार्कंडेय, डॉ. स्मिता कुलकर्णी, डॉ भावेश शेठ, मायमरच्या विभाग प्रमुख डॉ शिल्पा गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी राज्यस्तरीय परिषदेत संघटनेने दोन पारितोषिके मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
या प्रसंगी संघटनेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी–चिंचवड भूलतज्ज्ञ संघटनेने वर्षभर राबविलेल्या उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. विशेष उल्लेखनीय म्हणजे नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिक – जीवनरक्षक* या उपक्रमाला विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.डॉ.संजीवकुमार पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत स्व. नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली.
डॉ शुभांगी कोठारी, डॉ स्मिता कुलकर्णी, डॉ वैशाली सापटणेकर, डॉ हेमंत क्षीरसागर आणि डॉ मयुरेश उमाळकर यानी काव्यवाचन आणि गाणी सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रणिता काटे यांनी तर डॉ. भाविनी शहा यांनी आभार मानले.



















