
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ओरिएंटल मार्व्हल सोसायटी तर्फे गणेशोत्सव निमित्त शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमास महिला व पुरुषांनी भरगोस प्रतिसाद देऊन ९९ बॅगचे रक्त संकलन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रक्तपेढी यांच्या साहाय्याने हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. तसेच लाल पॅथॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.
यंदाचे रक्तदान व आरोग्य शिबिराचे हे सलग १२ वे वर्षे आहे, या शिबिरात अठरा वर्ष पूर्ण झालेले युवक व युवतींनी देखील विशेषता रक्तदान केले, तसेच काही कुटुंबांनी एकत्रित रित्या रक्तदान केले. यामध्ये सोसायटी चे अध्यक्ष- विशाल कुलकर्णी, सचिव – साकेत भलगट, खजिनदार- चंद्रशेखर शिरसागर , सुनिल कांदळकर, अभिजीत बाबर, वरून कुलकर्णी, श्याम कापरे, सुभाष जोशी, अभिजीत मांगले, हेमंत देशमुख, राजन पाटील, मारुती पाटील, योगेश लंके, अमित भिसे, प्रशांत पाटील, प्रमोद चौगुले, हेमंत देशमुख व सोसायटी मधील सदस्य तसेच ओम निसर्ग मंडळ यांचे सहकार्य लाभले.

















