ताज्या घडामोडीपिंपरी

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मला विजयी करा – खुदबुद्दीन होबळे

Spread the love

त्रिवेणीनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रुपीनगर, त्रिवेणीनगर, चिखली परीसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी व सर्वसामान्य कष्टकरी वर्गातील समस्यांची जाण असल्यामुळे मतदारांनी मलाच निवडून द्यावे असे आवहान भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार खुदबुद्दीन होबळे यांनी रुपीनगर, तळवडे परिसरातील नागरीकांना केले.

सध्या रोजगराच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या व परवडनारे घरे तसेच घराचे भाडे या बरोबरच तळवडे, चाकण, निघोजे या परिसरातील मिळत असलेला रोजगार यामुळे रुपीनगर, त्रिवेणीनगर, चिखली परिसरात कष्टकरी वर्गाची मोठी वसाहत निर्माण झाली आहे. त्या अनुशंगाने येथील इतरही समस्या बरोबरच वाहतुकीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. पण या समस्याकडे येथील कोणत्याच राजकारणी लोकाचे लक्ष नसल्यामुळे मतदारांचे अतोनात हाल होत असल्याचा आरोप खुदबुद्दीन होबळे यांनी सत्ताधारी व भोसरीतील इतर प्रमुख पक्षाच्या उमेदवारावर केला आहे. त्यामुळे नागरीकांनी व मतदारांनी माझ्याच हंडी या चिन्हासमोरील बटन दाबून मलाच बहुमतांनी विजयी करावे असे आवहान प्रचारावेळी केले. खुद्बुद्दीन होबळे यांनी सेक्टर 22, सहयोगनगर, घरकुल वसाहत, त्रिवेणी नगर, चिखली या परिसरातील मतदारांशी गाठी भेटी घेत संवाद साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button