शिळींब येथील आदिवासी ठाकर-कातकरी सेवा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या संकल्पनेतून उपक्रम


आदिवासींना मिळाले जातीचे दाखले, घरकुल योजनेचे अर्ज, शिधापत्रिकेचे अर्ज आणि आभा कार्डची सुविधा



पवनानगर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या संकल्पनेतून आदिवासी ठाकर-कातकरी समाजासाठी विशेष सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानामध्ये घरकुल योजना, जातीचे दाखले, तसेच शिधापत्रिका काढण्याच्या प्रक्रियेसाठी नागरिकांना सहकार्य करण्यात आले. या अभियानाद्वारे शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.

सेवा अभियान १२ आणि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी महादेव मंदिर, गावठाण, शिळींब येथे आयोजित करण्यात आले होते. या अभियानाद्वारे तिकोणा, जवन नं.१, २, ३, आजिवली, वाघेश्वर, कादव, शिळींब, बोडशिळ, डोंगरवाडी (कोटमवाडी), चावसर, मोरवे, तुंग आणि कोळे चाफेसर या गावांतील नागरिकांना आवश्यक सेवा प्रदान करण्यात आल्या.
काल (गुरुवारी) या अभियानाची यशस्वी सांगता झाली. अभियानाच्या समारोपप्रसंगी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष संतोष किसन कडू, शिळीम ग्रामपंचायत सरपंच सिद्धार्थ कडू, तसेच राहुल जगताप, शहाजी कडू, मधुकर कडू, मधुकर केदारी, मधुकर पवार, महादू मोरे, रघुनाथ पवार, गणपत पवार, बबन धनवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून अनेक आदिवासी ठाकर-कातकरी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला.
*अभियानातील प्रमुख निष्कर्ष*
जातीचे दाखले वितरीत: १७४
घरकुल योजनेअंतर्गत अर्ज: ३७
रेशनकार्ड प्रक्रियेसाठी अर्ज: ७०
आभा कार्ड: २२
या अभियानामुळे अनेक गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला असून, भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांना मदत करण्याचा मानस आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.








