- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चाकण,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि अल्प इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीमध्ये चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला. अल्प इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ देण्यात आली. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चाकण औद्योगिक वसाहातीमधील निघोजे चाकण येथील अल्फ इंजिनीअरिंग प्रा. लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये तिसरा वेतनवाढ करार झाला. यावेळी संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे पाटील, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, कंपनीचे डायरेक्टर पियर डिसूजा, प्लॅन्ट हेड विनोद टिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूर्णत्वास आला आहे. करारावरती संघटनेच्या वतीने सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उद्योजक राजु बोत्रे, चिटणीस रघुनाथ मोरे,…
सोलापूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. त्यात सोलापूर जिल्हा गेल्या चार ते पाच वर्षांपासून केळी लागवडीत व उत्पादनात अग्रेसर राहिला आहे. याच सोलापूर जिल्ह्यातील, करमाळा तालुक्यातील एका तरुण इंजिनियरने ब्लू जावा (निळी केळी) या नवीन प्रकारच्या केळीचे यशस्वी उत्पादन घेत देशभरातील व्यापाऱ्यांना आपल्या बांधावर येण्यास भाग पाडले आहे. निळ्या रंगाची केळी ही तिच्या रंगातील व चवीतील वेगळेपणामुळे ओळखली जाते. याचमुळे या केळींना फार मोठी मागणी आहे. आपल्या शेतातील G-9 (ग्रँड नैन) ते राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. पुणे या कंपनीकडून घेत असताना, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि तीन वेळ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अखेर ‘धनुष्यबाण’ खाली ठेवून ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. शिवसेनेला रामराम ठोकून आढळराव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. केवळ समायोजन किंवा तडजोड म्हणून महायुतीतील घटकपक्षांमध्ये हे पक्षांतर होत असल्याची माहिती आहे. शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंगळवार २६ मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेशाचा मुहूर्त निघाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार…
‘ॲग्रीवाईस – २४’ राष्ट्रीय परिषद पीसीईटीच्या पुणे बिझनेस स्कुलमध्ये संपन्न; देशभरातील पाचशे संस्थांमधील एक नऊशे प्रतिनिधींचा सहभाग पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतात शेती व्यवसाय आजही उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय ठेवले आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन शेती धोरणामुळे २०४७ पर्यंत भारतातील शेती उद्योग जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर पोहचू, असा विश्वास नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पुणे पब्लिक स्कूल (पीबीएस) च्या वतीने ‘ॲग्री वाईस २४’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.…
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील 32 प्रभागातून 32000 लाभार्थी यांच्यापर्यंत संपर्क साधण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार शनिवार, दि. 23 मार्च ते सोमवार, दि. 1 एप्रिल 2024 या दहा दिवसांमध्ये लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली आहे. प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये, प्रत्येक प्रभागात दररोज 100 लाभार्थी यांच्याशी संपर्क साधून नरेंद्र मोदी साहेबांच्या कमकाजा बाबत ते समाधानी आहेत की नाही याबाबतची माहिती घेऊन पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- निगडी ते किवळे पुलावर अप्पुघरकडे जाणा-या जंक्शन येथे गतीरोधक बसविण्याची मागणी माजी स्थानिक नगरसेवक अमित गावडे यांनी महापालकेकडे केली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांन निवेदन दिले आहे. त्यात गावडे यांनी म्हटले आहे की, दळणवळण सुकर व्हावे यादृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती, व्हाया रावेत ते किवळे या मार्गावर पुल उभारण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाची चांगली सोय झाली आहे. परंतु, काही त्रुटी आहेत. त्याची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. या पुलावरुन निगडीकडून किवळेच्या दिशेने जाताना उजव्या आणि किवळेवरुन निगडीच्या दिशेने येताना डाव्या बाजूला धोकादायक वळण आहे. वेगात वाहने आल्यास या वळणावरुन पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत वेगात आलेले वाहन कंट्रोल करताना अडचणी येताना दिसतात. एखादा मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ दोन्ही बाजूला मोठे गतिरोधक बसवावेत. जेणेकरुन वाहनांचा वेग कमी होईल. अपघाताचीही भिती राहणार नाही. अप्पुघर, दुर्गाटेकडीकडे जाणा-या जंक्शनवर सातत्याने अपघात होत आहेत. दुर्गाटेकडी फिरण्यासाठी सकाळी हजारो लोक जातात. जंक्शनवरुन जाणे धोकादायक झाले आहे. या चौकात मागील पंधरा दिवसांपूर्वी फिरण्यासाठी जाणा-या एका महिलेला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिली. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. सुरक्षा रक्षक नेमावेत. अन्यथा भविष्यात अशी दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही गावडे यांनी म्हटले आहे.
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी भारतीय जनता पार्टी कडून शहरभरात शेकडो सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर भाजपचे चिन्ह कायमस्वरूपी रंगविण्यात आले असून ते तात्काळ मिटविण्यात यावे, तसेच संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यावतीने शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर शहरात महानगरपालिका प्रशासनाकडून राजकीय पक्ष चिन्ह नावे इत्यादी झाकण्याचे तसेच राजकीय जाहिरात होर्डिंग फ्लेक्स काढण्याचे काम करण्यात येत…
‘एमआयटी एडीटी’त सहाव्या राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतातील तंत्रज्ञानाने सध्या जगाला भुरळ घातली आहे. चांद्रयान सारख्या अंतराळ मोहीमा, जगातील सर्वांत मजबूत मिसाईल, विविध प्रकारचे ट्रोन्स बनवून आपल्या शास्त्रज्ञांनी जगाचे लक्ष आकर्षित केले आहे. भारत आता सॉफ्टवेअरसह हार्डवेअर क्षेत्रातही स्वावलंबी बनला आहे. त्यामुळे या स्पर्धात्मक युगात आपल्याकडील लोकल तंत्रज्ञानाला प्रचंड मागणी मिळत असल्याने ते ग्लोबल व्हायला हवे, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे(डीआरडीओ) माजी संचालक व एस-व्यासा विद्यापीठ बंगळुरूचे प्र.कुलगुरू पद्मश्री डाॅ.प्रल्हाद रामराव यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात ‘इनोव्हेटिव्ह ग्लोबल टेक्नॉलॉजी ट्रेंड्स’ या विषयावर आधारीत सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. याप्रसंगी,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून “उष्माघात” संबंधी शहरवासीयांनी घ्यावयाची दक्षता आणि उपाययोजना याबाबत आवाहन करण्यात आले. महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी यासंदर्भात आव्हान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. सध्या हवामानातील बदल झालेला असून शहराचे तापमान खूप वाढत आहे. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याची शक्यता असल्याने शहरवासीयांनी उष्माघातासारख्या जीवघेण्या परिस्थितीतून वाचण्यासाठी दक्षता घ्यावी. उष्माघात होण्याची कारणे : उन्हाळ्यात शारिरिक श्रम, मेहनतीचे, व मजुरीची कामे फार वेळ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चेन्नईच्या संघाने ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवले आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या आगामी हंगामात सीएसकेचा कर्णधार नसणार आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या भूमिकेत असेल. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएलचे पाच किताब जिंकले आहेत. मागील हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला नमवून धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली. सीएसकेकडून सोशल मीडियावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. चेपॉकवर चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्याआधी धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला, संघाची धुरा युवा…
