ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची माहिती

Spread the love

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील 32 प्रभागातून 32000 लाभार्थी यांच्यापर्यंत संपर्क साधण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार शनिवार, दि. 23 मार्च ते सोमवार, दि. 1 एप्रिल 2024 या दहा दिवसांमध्ये लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली आहे.

प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये, प्रत्येक प्रभागात दररोज 100 लाभार्थी यांच्याशी संपर्क साधून नरेंद्र मोदी साहेबांच्या कमकाजा बाबत ते समाधानी आहेत की नाही याबाबतची माहिती घेऊन पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी लाभार्थी यांना आवाहन करण्यात येणार आहे.

लाभार्थी संपर्क अभियानांतर्गंत 32 प्रभागांसाठी 32 संयोजक नेमण्यात आले आहेत. या 32 संयोजकांनी मंडल अध्यक्ष यांच्याशी समन्वय साधून आपल्याला दिलेल्या प्रभागातील सर्व प्रदेश, जिल्हा, मंडल पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व वॉरियर्स, सर्व बूथ प्रमुख आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या समवेत संपर्क साधून या अभियानातील दैनंदिन घडामोडींची माहिती संकलीत करण्यात येणार आहे.

पिंपरी विधानसभा निहाय संयोजक :

प्राधिकरण आकुर्डी मंडल : – प्रभाग क्रमांक १० संभाजी नगर मोरवाडी :  अजित भालेराव,  प्रभाग क्रमांक १४ काळभोर नगर : नंदू भोगले, प्रभाग क्रमांक १५ प्राधिकरण : विजय शिनकर, प्रभाग क्रमांक १९ उद्यम नगर :  जयदीप खापरे.

पिंपरी दापोडी मंडल :- प्रभाग क्रमांक ४ बोपखेल : सुधीर चव्हाण, प्रभाग क्रमांक ९ खराळवाडी :  दीपक भंडारी, प्रभाग क्रमांक २० संत तुकाराम नगर : देवदत्त लांडे, प्रभाग क्रमांक २१ पिंपरी गाव : गणेश वाळुंजकर, प्रभाग ३० दापोडी : विशाल वाळुंजकर.

चिंचवड विधानसभा निहाय संयोजक :

रावेत काळेवाडी मंडळ : प्रभाग क्रमांक १६ किवळे रावेत : अभिजीत बोरसे, प्रभाग क्रमांक १७ वाल्हेकरवाडी : शेखर चिंचवडे, प्रभाग क्रमांक १८ केशवनगर : योगेश चिंचवडे, प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी विजयनगर : आकाश भारती.

वाकड थेरगाव मंडळ : प्रभाग क्रमांक २३ शिवतीर्थ नगर पडवळनगर : शाकीर शेख, प्रभाग क्रमांक २४ गणेश नगर : सिद्धेश्वर बारणे, प्रभाग क्रमांक २५ पुनावळे : दत्ता ढगे, प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख : प्रीती कामतीकर.

सांगवी रहाटणी मंडळ : प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर रहाटणी : गोपाळ माळेकर, प्रभाग क्रमांक २९ पिंपळे सौदागर : सीमा चव्हाण, प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव सुदर्शन नगर : मनोज कुमार मारकड, प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी : खंडू देव कथोरे, प्रभाग क्रमांक ३२ जुनी सांगवी :  हिरेन सोनवणे.

भोसरी विधानसभा निहाय संयोजक :

निगडी चिखली मंडल : प्रभाग क्रमांक १ तळवडे चिखली : नामदेव पवार, प्रभाग क्रमांक ११ कृष्णा नगर कोयना नगर : पोपट हजारे, प्रभाग क्रमांक १२ रुपीनगर त्रिवेणीनगर : महादेव कवीतके,

प्रभाग क्रमांक १३ निगडी यमुना नगर : दीपक मोढवे.

चऱ्होली दिघी मोशी मंडल : प्रभाग क्रमांक २ जाधववाडी मोशी : दिनेश यादव, प्रभाग क्रमांक ३ मोशी चऱ्होली : नंदकुमार दाभाडे, प्रभाग क्रमांक ४ दिघी : नामदेव रडे, प्रभाग क्रमांक ५ गवळीनगर चक्रपाणी वसाहत : कविता भोंगाळे.

भोसरी इंद्रायणी नगर नेहरूनगर मंडल : प्रभाग क्रमांक ६ सदगुरु नगर धावडे वस्ती : जयदीप कर्पे,

प्रभाग क्रमांक ७ भोसरी गावठाण : राजश्री जायभाय, प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणीनगर बालाजीनगर : गीता महेंद्रु, प्रभाग क्रमांक ९ खराळवाडी वास्तुउद्योग : वैशाली खाडे. यांची नेमणूक करण्यात आली आहे.

कोट..

फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार… हे साध्य करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपाच्या वतीने दहा दिवसीय लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हे अभियान महत्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने या अभियानात स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन काम करायचे आहे. असे आवाहन ही करण्यात आले आहे.

शंकर जगताप, शहराध्यक्ष– पिंपरी चिंचवड भाजपा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button