“राईज एन शाईन” च्या ब्लू जावा केळीला शेतकऱ्यांची पसंती

सोलापूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. त्यात सोलापूर जिल्हा गेल्या चार ते पाच वर्षांपासून केळी लागवडीत व उत्पादनात अग्रेसर राहिला आहे. याच सोलापूर जिल्ह्यातील, करमाळा तालुक्यातील एका तरुण इंजिनियरने ब्लू जावा (निळी केळी) या नवीन प्रकारच्या केळीचे यशस्वी उत्पादन घेत देशभरातील व्यापाऱ्यांना आपल्या बांधावर येण्यास भाग पाडले आहे.
निळ्या रंगाची केळी ही तिच्या रंगातील व चवीतील वेगळेपणामुळे ओळखली जाते. याचमुळे या केळींना फार मोठी मागणी आहे. आपल्या शेतातील G-9 (ग्रँड नैन) ते राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. पुणे या कंपनीकडून घेत असताना, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ भाग्यश्री प्रसाद पाटील ह्यांनी श्री अभिजीत पाटील ह्यांना निळी केळी लागवड करण्यास प्रोत्साहन दिले तसेच कंपनीचे फार्म ऑपेरेशन मॅनेजर अमेय पाटील ह्यांनी लागवडीपच्यात लागणाऱ्या मदतीची हमी दिली व मार्गदर्शन केले.




त्याबाबतची माहिती ऐकून अभिजीत यांची जिज्ञासा जागी झाली आणि त्यांनी याबाबत अधिक जाणून घेण्यास सुरुवात केली. मोठमोठ्या शहरातील फाईव्ह आणि सेव्हन स्टार हॉटेल्स व मोठ्या मॉलमध्ये या केळीची १०० रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे त्यांना समजले. यातून प्रेरणा घेऊन श्री अभिजीत पाटील यांनी ब्लू जावा केळी करमाळा तालुक्यातील वाशिंबे इथल्या आपल्या शेतात लावण्याचा निर्णय घेतला.
राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. या कंपनीनेच शेतकऱ्यांना उच्च परतावा देणाऱ्या रेड बनाना (Red Banana) म्हणजेच लाल केळी आणि वेलची केळी (Yelakki Banana) हे वाण उपलब्ध करून दिले. या दोन प्रकारात देशातील तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचे वर्चस्व होते. ते कंपनीच्या मदतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोडीत काढले. आता कंपनीकडे परदेशातून सुद्धा या केळीच्या रोपांची मागणी वाढतेय.
ब्लू जावा केळी, ज्याला आईसक्रीम केळी किंवा व्हॅनिला केळी म्हणूनही ओळखले जाते, या वाणाची निर्मिती दक्षिण पूर्व आशियामध्ये झालेली असून, हे फळ खूप खास आहे. या फळाची चव व्हॅनिला आईसक्रीम सारखी आहे. श्री. अभिजीत पाटील हे एक प्रगतिशील शेतकरी असून, त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ते लाल केळी, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद या सारख्या अनोख्या पिकांची जोपासना करण्यात आघाडीवर आहेत. श्री. पाटील ह्यांनी आता ब्लू जावा केळीची दोन एकर क्षेत्रामध्ये लागवड केली आहे, आणि पुणे येथील ‘ राईज एन शाईन ‘ बायोटेक प्रा. लि. कडून मिळालेल्या रोपांच्या गुणवत्तेमुळे ते अत्यंत समाधानी आहेत. त्यांच्यासोबतच केळीरत्न श्री कपिल जाचक व इतर अनेक शेतकऱ्यांनी ह्या वाणाची प्रायोगिक तत्वावर लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले आहे.
निळ्या केळीमध्ये अनेक पोषक अन्नद्रव्य असल्याचे मानतात. सुरवातीला निळसर हिरवी दिसणारी हि केळी परिपक्व झाल्यांनतर पिवळी होतात. केवळ ५ ते ६ इंच लांबी आणि आकाराने गोलसर असणाऱ्या निळ्या केळीचा स्वाद अगदी व्हॅनिला फ्लेवर प्रमाणे असतो.
दरम्यान “ शेतकऱ्यांना व्यवसायिक शेती करण्यासाठी उच्च उत्पादन देणारी रोपे देण्यास व त्यांचे संगोपन व वाढीसाठी मार्गदर्शन करण्यास राईज एन शाईन बायोटेक प्रा लि कंपनी कटीबद्ध आहे. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या पाठीशी कंपनी नेहमी खंबीरपणे उभी राहील” असे मत कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ भाग्यश्री पाटील ह्यांनी ह्या प्रसंगी व्यक्त केले.
निळ्या केळीमध्ये अनेक पोषक अन्नद्रव्य असल्याचे मानतात. सुरवातीला निळसर हिरवी दिसणारी हि केळी परिपक्व झाल्यांनतर पिवळी होतात. केवळ ५ ते ६ इंच लांबी आणि आकाराने गोलसर असणाऱ्या निळ्या केळीचा स्वाद अगदी व्हॅनिला फ्लेवर प्रमाणे असतो.
दरम्यान “ शेतकऱ्यांना व्यवसायिक शेती करण्यासाठी उच्च उत्पादन देणारी रोपे देण्यास व त्यांचे संगोपन व वाढीसाठी मार्गदर्शन करण्यास राईज एन शाईन बायोटेक प्रा लि कंपनी प्रतिबद्ध आहे. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या पाठीशी कंपनी नेहमी खंबीरपणे उभी राहील” असे मत कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ भाग्यश्री पाटील ह्यांनी ह्या प्रसंगी व्यक्त केले.








