- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील नागलोक असोसिएशनच्या वतीने महापुरुषांची संयुक्त जयंती व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व्याख्याते डॉ. प्रकाश हसनाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम गाणार, उपाध्यक्ष किसनराव थूल, उपाध्यक्ष वसंतराव बोले, विजय चौधरी व प्रा. रवींद्र इंगोले, भंते सुमंगल, भंते विपश्यीबोधी, भंते बोधीराजा आदी उपस्थित होते. सुत्तपठन केल्यानंतर भंते सुमंगल यांनी धम्मदेशना देताना सांगितले की, धम्माच्या आचारणानेच मनुष्यास सुख, शांती व आनंद मिळतो. मनुष्य शिलेचा विकास, विवेक, प्रज्ञा जागृत करू शकतो. डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी ‘फुले- शाहू- आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून…
लेख – आरोग्य क्षेत्रात सेवाभावीपणे काम करणारे पंच्याहत्तरीतील तरुण चैतन्यमूर्ती – डॉ. लक्ष्मण कार्ले
आरोग्य क्षेत्रात सेवाभावीपणे काम करणारे पंच्याहत्तरीतील तरुण चैतन्यमूर्ती – डॉ. लक्ष्मण कार्ले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजात असे फार थोडे लोक आहेत, जे आपल्या प्रोफेशनसोबतच समाजहितालाही प्राधान्य देत आलेले दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे तळेगाव दाभाडे येथील डॉ. लक्ष्मण कार्ले. डॉ. लक्ष्मण कार्ले वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करीत आहेत. समाजातील गरीब, गरोदर महिलांच्या आरोग्यात सुधारणा झाली पाहिजे, या ध्येयाने पंच्याहत्तरीतला हा तरुण सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा धांदोळा… डॉ. लक्ष्मण कार्ले यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील पांढरी हे होय. ४ मे १९५० हा त्यांचा जन्मदिवस. सहा भावंडांमध्ये हे थोरले आहेत. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून एमबीबीएस, डीसीपी आणि नाक…
हडपसर , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदार संघात रँली काढत. उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार आढळराव पाटील यांचे स्वागत केले. शेवाळेवाडी येथून रँलीस सुरवात करण्यात आली. रँली सातववाडी व गोंधळीनगर या ठिकाणी महिलांनी औक्षण करुन स्वागत केले. दरम्यान, यावेळी महिला, तरुण-तरुणी यांचा मोठा सहभाग होता. एकच वादा शिवाजी दादा, जनतेचा पक्का निर्धार, शिवाजीदादाच खासदार, येऊन येऊन येणार कोण, शिवाजीदादांशिवाय आहेच कोण..अशा प्रकारच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. ज्येष्ठ नागरिक पुढे सरसावून शिवाजीराव आढळराव पाटील यांना आशिवाद…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण आकुर्डी भागात महाविकास आघाडी नियोजन आणि प्रचारामध्ये आघाडीवर असून आघाडीचे घटक पक्ष, संजोग वाघेरे पाटील यांचा मित्र परिवार आणि सर्व कार्यकर्ते एकदिलाने ,एकजुटीने काम करत असून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा विजय परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास उषा संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला. आकुर्डी प्रभागातील दत्तवाडी,विठ्ठलवाडी,विवेकनगर,तुळजाइ वस्ती, श्रीकृष्ण नगर,क्रांतीनगर, एकता नगर,साई दर्शन नगर,लाल बहाद्दूर शास्त्री नगर, सह्याद्री कॉलनी आकुर्डी गावठाण, पंचतारांनगर, गुरुदेवनगर,गंगानगर भागात आज उषा संजोग वाघेरे यांनी नागरिकांच्या ,महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि संजोग वाघेरे पाटील यांचे चाहता वर्ग या सर्वांची गाठी भेटी घेतल्या त्यावेळी त्यांनी मत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सर्व पदाधिकारी, संचालक, स्विकृत संचालक, सल्लागार, सभासद, कर्मचारी वर्ग यांना जाहीर आवाहन केले. आपल्या सर्व कामगार मतदारांसह, वरील प्रतिज्ञा घेऊन निस्वार्थपणे मतदानाचा हक्क बजावण्यास तयार करावे जेणे करून भारताची लोकशाही बळकट होण्यास मदत होईल.यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे ,जयंत कड आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमाला – प्रथम पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “शिक्षणातून संस्कार आणि कायद्याचा धाक असेल तरच रामराज्य येईल!” असे मय सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेतील ‘देशहित में पॉंच नए कानून’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय बोलत होते. सनदी लेखापाल मनोजकुमार आगरवाल, मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय पुढे म्हणाले की, “ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेले किमान पन्नास कायदे हे कालबाह्य आणि निरुपयोगी झालेले आहेत. संविधानाच्या पुस्तकात श्रीरामासह अनेक महापुरुषांच्या प्रतिमा…
चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील सेंट अँड्र्यूज हायस्कूल मधील प्राथमिक व माध्यमिक विभागातील वार्षिक परीक्षेनंतर दिनांक 15 ते 30 एप्रिल दरम्यान उन्हाळी शिबिर 2024 चे आयोजन करण्यात आले. सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. योगा, क्रिकेट, फुटबॉल, अर्चरी, झुंब्बा, बुद्धिबळ, बॅडमिंटन क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक जुही मिश्रा, केतकी मुंगी, गीतांजली पाटील, रवी सूर्यवंशी, मंगेश येरुणकर, संजय डोके, मुख्य संयोजक वेंकटेश चव्हाण यांच्या करवी प्रशिक्षण घेणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. शिबिराच्या सांगता समारंभ प्रसंगी फादर श्री बनसोडे विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती वरिष्ठ शिक्षिका पारखी जॅकलिन, सुनंदा पंडित उपस्थित होते. फादर श्री बनसोडे…
– काळेवाडीत ज्योतिबा उद्यानात ‘मॉर्निग वॉक पे चर्चा’ पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी काळेवाडी येथील ज्योतिबा उद्यानात आज, शनिवारी (4 मे) योगा ग्रुपच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेत भविष्यात मावळ लोकसभा मतदारसंघातील कामांबाबत भूमिका मांडून लोकसभेचे नेतृत्त्व करण्याची संधी द्यावी, असे आवाहन संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांना केले. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची “मॉर्निग वॉक डिप्लोमसी” प्रभावी ठरत आहेत. ते पिंपरी चिंचवड शहरातील विविध उद्यानात सकाळी मॉर्निग वॉकला जात नागरिकांशी संवाद साधून आपली भूमिका मांडत आहेत. त्यांनी काळेवाडी येथील…
– सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेवू – खोपोलीतील बैठकीत सकल मराठा बांधवांचा संजोग वाघेरेंना पाठिंबा खोपोली (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करण्याची भुमिका राजकारण व समाजकारण करताना नेहमीच घेतली आहे. मात्र, मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून समाजासाठी भुमिका घेण्यासाठी मी बांधील आहे. मराठा आरक्षणाबाबत संसदेत भक्कमपणे बाजू मांडण्याचे काम करु. मराठा समाजासोबत सर्वच समाज घटकांना न्याय देवू, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी दिला. खोपोली येथील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडलेल्या बैठकीत कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरणसह रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, शहरातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती करण्यात येत असून विशेषतः नवोदित मतदार, महिला मतदार याकरिता महिला बचत गट, सोसायट्या, उद्याने, माॅल यासारख्या सर्व क्षेत्रात विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून शहरातील प्रत्येक मतदाराने लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्प चौक येथे भव्य दुचाकी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त…
