विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांच्या अंगीभूत कला, क्रीडाच्या विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे : फादर राजेश बनसोडे


चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील सेंट अँड्र्यूज हायस्कूल मधील प्राथमिक व माध्यमिक विभागातील वार्षिक परीक्षेनंतर दिनांक 15 ते 30 एप्रिल दरम्यान उन्हाळी शिबिर 2024 चे आयोजन करण्यात आले. सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. योगा, क्रिकेट, फुटबॉल, अर्चरी, झुंब्बा, बुद्धिबळ, बॅडमिंटन क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक जुही मिश्रा, केतकी मुंगी, गीतांजली पाटील, रवी सूर्यवंशी, मंगेश येरुणकर, संजय डोके, मुख्य संयोजक वेंकटेश चव्हाण यांच्या करवी प्रशिक्षण घेणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.



शिबिराच्या सांगता समारंभ प्रसंगी फादर श्री बनसोडे विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती वरिष्ठ शिक्षिका पारखी जॅकलिन, सुनंदा पंडित उपस्थित होते. फादर श्री बनसोडे यांच्या हस्ते प्रशिक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सांगता समारंभात फादर राजेश बनसोडे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणात अग्रेसर आहात. आपल्या अंगीभूत कलागुणांचा विकास कला, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात करीत भविष्यात नावलौकिक मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थानी प्रयत्नशील राहावे. ताणतणाव विरहित सांधीक भावनेतून खेळात चमकदार कामगिरी करावी. शिक्षक व संस्थेतील क्रीडा शिक्षकांनीही नियमित व्यायाम आपले आरोग्य उत्तम ठेवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे यावेळी आव्हान केले.

सेंट अँड्र्यूज हायस्कूलचे क्रीडा प्रमुख व शिबिराचे मुख्य संयोजक वेंकटेश चव्हाण म्हणाले; विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांचा लहान वयापासूनच गुणात्मक विकास व्हावा. यासाठी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुष्य चांगले जगायचे असेल तर नियमित व्यायाम केले पाहिजे. जर आपले वाढते वजन पोटाचा आकार वाढत असेल तर स्वतःच दक्ष राहून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. यावेळी शिबिरार्थीनीही आपले मनोगत व्यक्त केले.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रोजी फर्नांडिस यांनी केले. क्रीडा शिबीर यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो ओळ : फादर राजेश बनसोडे यांच्या हस्ते प्रशिक्षण देणाऱ्या तज्ञ शिक्षकाचा सन्मान करण्यात आला छायाचित्रात वरिष्ठ शिक्षीका पारखी जॅकलीन, सुनंदा पंडित, व्यंकटेश चव्हाण आदी मान्यवर.








