ताज्या घडामोडीपिंपरीपुणेशिरूर

महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदार संघात रॅली

Spread the love

हडपसर , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदार संघात रँली काढत. उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार आढळराव पाटील यांचे स्वागत केले. शेवाळेवाडी येथून रँलीस सुरवात करण्यात आली. रँली सातववाडी व गोंधळीनगर या ठिकाणी महिलांनी औक्षण करुन स्वागत केले.

दरम्यान, यावेळी महिला, तरुण-तरुणी यांचा मोठा सहभाग होता. एकच वादा शिवाजी दादा, जनतेचा पक्का निर्धार, शिवाजीदादाच खासदार, येऊन येऊन येणार कोण, शिवाजीदादांशिवाय आहेच कोण..अशा प्रकारच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. ज्येष्ठ नागरिक पुढे सरसावून शिवाजीराव आढळराव पाटील यांना आशिवाद देताना दिसत होते. सर्व ठिकाणचे नागरिक तुम्हालाच मतदान करण्याची ग्वाही देताना दिसत होते. पुण्याच्या माजी महापौर वैशाली बनकर यांच्या निवास्थानी आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच महायुतीमधील अजय न्हावले, विठ्ठल विचारे, अश्विनी वाघ, बबन पवार, शशिकला वाघमारे, महेश ससाने, सागर राजे भोसले, स्मिताताई गायकवाड उज्वलाताई जंगले, अजिनाथ भोईटे, मारुती आबा तुपे, विजयाताई कापरे संदीप दळवी, साधना पाटील, आदी पदाधिकारी व नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देत संवाद साधला. यावेळी फुलांची उधळण व फटाके फोडून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अनेक कुटुंबातील नागरिकांनी उमेदवार आढळराव पाटील यांना रोप भेट देनून स्वागत केले. या रँलीत महिला, तरुण-तरुणी यांचा मोठा सहभाग होता. यावेळी महिलांनी ‘अबकी बार, चारसो पार’ शिवाजी दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, ‘एकच वादा, शिवाजी दादा’अशी घोषणाबाजी केली.

यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुऱेश घुले, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, माजी महापौर वैशाली बनकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, हडपसर विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष शंतनू जगदाळे, विजय कामठे, अमर आबा तुपे,संदीप दळवी,संदीप बडे ,शिवराज घुले, सुधीर घुले,सनी तुपे, बिना कट्टीमनी, रोहिणी क्षिरसागर, बबन जगताप, अक्षय शेवाळे, अमित आबा घुले, पुरुषोत्तम दारवटकर, नितीन तात्या होले, राहुल होले, शरद होले, रामभाउ शिंदे, शिल्पा होले आदी महायुतीमधील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button