Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साज पुणे प्रस्तुत “ये इश्क नहीं आसां” ही उर्दू गजलांची मैफल, गुरुवार, दिनांक ४ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह), निगडी प्राधिकरण येथे संपन्न होणार आहे. साज पुणे ही संस्था गेली १२ वर्षे सातत्याने गजलचा प्रसार आणि लोकप्रियता वाढावी म्हणून उर्दू, हिंदी, मराठी गजलांचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम करीत आहे. या संस्थेच्या डॉ. शशिकला शिरगोपीकर, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर आणि गायत्री सप्रे – ढवळे, हे सर्व प्रथितयश गायक कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. उर्दू गजल पारंपरिक रिवायती पद्धतीने सादर करण्यामध्ये या सर्व गजल गायकांचा हातखंडा आहे. रसिकांनी गौरवलेल्या…

Read More

*शनिवार, ०६ जुलै रोजी आई कृतज्ञता सोहळा पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आशिया मानवशक्ती विकास संस्था – पुणे आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ०६ जुलै २०२४ रोजी दुपारी ठीक ४:०० वाजता ऑटोक्लस्टर सभागृह, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे आई कृतज्ञता सोहळा व पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ समाजसुधारक, पद्मश्री गिरीश प्रभुणे, तसेच नारायण सुर्वे…

Read More

चिंचवड मध्ये शिंदे सरकारचे अभिनंदन व शिवसेनेचा आनंद उत्सव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महिलांचा सन्मान वाढवत ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील महिलांना वेळेत मिळावा यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्फत आपण करणार आहोत असे शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस यांनी सांगितले. शिंदे सरकारने एक जुलैपासून राज्यातील गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. यामध्ये महिलांना महिन्याला दीड हजार रुपये अनुदान व वर्षात तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. या निमित्त शिंदे सरकारचे अभिनंदन करीत चापेकर चौक, चिंचवड…

Read More

महसूल मंत्री विखे-पाटील यांचे प्रस्ताव मान्य करुन घेण्याचे आदेश भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रस्तावित रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणेकामी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव मान्य करुन घ्यावा, असे आदेश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे भूसंपादनाअभावी रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागण्याच्या प्रक्रियेतला गती मिळणार आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महसूल मंत्री विखे-पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी रस्त्यांच्या कामांसाठी भूसंपादन हा प्रमुख अडथळा असून, त्या करिता निधी उपलब्ध…

Read More

आधुनिक फुल शेतीमधील उल्लेखनीय कार्याचा गौरव मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जन्मदिनी व कृषिदिनानिमित्त यंदाचा वसंतराव नाईक पुरस्कार डॉ. भाग्यश्री प्रसाद पाटील (व्यवस्थापकीय संचालिका – राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. पुणे) यांना मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आधुनिक फुल शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे, सन्मानीय अतिथी – राज्याचे कृषीमंत्री मा. श्री धनंजय मुंडे, विशेष अतिथी – महात्मा फुले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील पबची पाश्चिमात्य संस्कृती तातडीने हद्दपार करा. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिमा मलिन होत आहे.नाहीतर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर रस्त्यावर उतरू, असा इशारा मनसेने आयुक्तांना दिला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्या काही दिवसापुर्वी पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा काही दिवसात इतर भागातील व्हिडिओ समोर आले आहेत. नुकतेच पुण्यातील फक्त २३ पबला कायदेशीर परवानगी आहे आणि प्रत्यक्षात १४४ सुरु होते हि आकडेवारी उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पबची पाश्चिमात्य संस्कृती तातडीने हद्दपार करा. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील नेहरूनगर न्यायालयात नवीन भारतीय न्याय संहिता (बीएनएस),भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियमन या कायदा विषयांवर असोसिएशन च्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वीच्या कायद्यांमध्ये काही बदल करून शासनाने भारतीय न्याय सहिता (बीएनएस), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियमन हे नवीन कायदे अस्तित्वात आणलेले असून या कायद्यांची अंमलबजावणी १ जुलै पासून संपूर्ण देशभर करण्यात येत आहे. या कायद्यामधील झालेले बदल या विषयी वकील बंधू व भगिनी यांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने असोसिएशन च्या वतीने जिल्हा न्यायालयाचे मा.न्यायाधीश  राजन गुंजीकर  यांचे या कायद्यांविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्याकरिता निमंत्रित करण्यात…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नवीन भारतीय न्याय संहितेत महिलां वरील गुन्ह्यांची इतर गोष्टींच्या तुलनेत प्राधान्याने दखल घेण्यात आली आहे. या कायद्यात महिला आणि मुलां विरुद्धच्या गुन्ह्यांवर जास्त लक्ष देऊन फिर्यादीस न्याय देण्यास भर देण्यात आला असल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली. आळंदी पोलीस स्टेशन मध्ये आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमेटी, महिला दक्षता समिती, स्थानिक नागरिक, प्रतिष्ठित पदाधिकारी यांचे समवेत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य कायदा हे नवीन तीन कायदे १ जुलै पासून कार्यान्वित होत आहेत. या बाबत संवाद बैठक आणि जनजागृतीसाठी मार्गदर्शन करताना आळंदी पोलीस…

Read More

महात्मा बसवेश्वर हे लोकशाहीचे आद्य प्रवर्तक – डॉ. श्रीपाल सबनीस निगडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-“महात्मा बसवेश्वर हे लोकशाही समाज व्यवस्थेचे आद्य प्रवर्तक असून समतेच्या विचारांचे पहिले पुरस्कर्ते आहेत. त्यांचे विचार लोकशाही व्यवस्था, नवसमाजनिर्मिती आणि शोषणमुक्त समाजासाठी पूरक आहेत. भौतिकतावादी विचार आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचा व्यापक समन्वय बसवेश्वरांच्या कार्यकर्तृत्वात आढळून येतो. लोकशाही शाबूत ठेवायचीअसेल तर बसवेश्वरांचे विचार सर्व दूर पोहोचवले पाहिजेत.” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. सकल लिंगायत समाज यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यामध्ये “महात्मा बसवेश्वरांचे कार्य” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प किसन महाराज चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार…

Read More

– वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अठरा सेवेचे पुणे येथे उद्घाटन – रिक्षा चालक ,कष्टकऱ्यांमार्फत पिंपरी ते पंढरपूर पर्यंत उपक्रमाचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारकऱ्यांच्या सेवेतच विठुमाऊलीचे दर्शन आम्हाला मिळत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करण्याचा ध्यास आम्ही घेतला. त्यांना विविध प्रकारच्या १८ सेवा दिल्या जात आहेत. संघटनेचे पदाधिकारी या मध्ये सहभागी होतात. निगडी, पिंपरी बोपोडी आता पुणे, हडपसर येथे ही सेवा दिली जाणार आहे. पंढरपूर पर्यंत ही सेवा आम्ही देणार आहोत. वारकऱ्यांना सेवा देणे हे समाधान देणारे आहे. आगामी काळात इंद्रायणी नदी प्रदूषण रोखून संत भूमी टिकविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत…

Read More