आशिया मानवशक्ती विकास संस्था – पुणे आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी आई कृतज्ञता सोहळा
*शनिवार, ०६ जुलै रोजी आई कृतज्ञता सोहळा
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आशिया मानवशक्ती विकास संस्था – पुणे आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ०६ जुलै २०२४ रोजी दुपारी ठीक ४:०० वाजता ऑटोक्लस्टर सभागृह, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे आई कृतज्ञता सोहळा व पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ समाजसुधारक, पद्मश्री गिरीश प्रभुणे, तसेच नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष श्रमश्री, बाजीराव सातपुते, ज्येष्ठ प्रकाशक नितीन हिरवे यांची प्रमुख उपस्थिती राहील. सोहळ्यात कमल खांदवे, राणूबाई उमाप, वत्सलाबाई सातपुते, विमल मरळे आणि सुभद्रा वाल्हेकर या मातोश्रींना राजमाता जिजाऊ कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे; तसेच बाजीराव सातपुते लिखित ‘थोरांच्या पाऊलखुणा’ या चरित्रवर्णनात्मक ग्रंथाचे प्रकाशन संपन्न होणार आहे. विनाशुल्क असलेल्या या सोहळ्याचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.