- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ऑगस्ट मध्ये भाजपाच्या संघटनात्मक सर्व ७८ जिल्हे आणि पक्षाच्या सर्व ७७८ मंडलांमध्ये अधिवेशने तसेच विस्तारित कार्यकारिणी बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे, या अनुषंगाने भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्यावतीने शहरात शुक्रवारी, दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली. यावेळी, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, शितल शिंदे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज वनश्री महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र, भावी आमदार अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी १४ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने बुधवार, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अरुण कन्स्ट्रक्शन ऑफिस, पिंपळे गुरव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत नटसम्राट निळू फुले सभागृह, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव येथे “महाराष्ट्राचा मर्दानी बाणा” हा विशेष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या नियोजनाचा महापालिका स्तरावर आयुक्त शेखर सिंह यांनी आज आढावा घेतला. कार्यक्रमाच्या दृष्टीने नियोजन करून संबंधित महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी आपसांत योग्य समन्वय ठेऊन सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना लाभाचा राज्यस्तरीय शुभारंभ १७ ऑगस्ट रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने शासन स्तरावरून पिंपरी चिंचवड महापालिकेला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने महापालिकेने नियोजन केले असून त्याबाबत आयुक्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यदिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे. नागरिकांनी या ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात होणाऱ्या या मुख्य राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी, माजी नगरसदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात येणार आहे. तसेच मतदान जनजागृतीपर विशेष उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-महापालिकेच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या चिखली येथील टाऊन हॉलचे तसेच आकुर्डी येथील ग. दि माडगुळकर नाट्यगृहाचे भाडे किंवा अनामत दर व इतर भाडे आकारणीसाठीच्या विषयाला तसेच इतर विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज प्रशासकीय मान्यता दिली. महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रशासक सिंह यांनी विविध विषयांना मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रेक्षागृह आणि नाट्यगृह येथे नाटक तसेच विविध स्वरूपाचे सांस्कृतिक…
प्रत्येक रक्तदात्याला मिळणार ६ लाखांचे सुरक्षा कवच चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने ‘रक्तदान महायज्ञ’चे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला ६ लाखांचे सुरक्षा कवच देखील दिले जाणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जास्तीजास्त नागरिकांनी या रक्तदान महायज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘रक्तदान महायज्ञ’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ३ लाखांचा अपघाती विमा आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीत राष्ट्रमाता, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शहराध्यक्ष ओबीसी सेल विशाल जाधव यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर चंद्रजी पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी अभिवादन करताना ते म्हणाले, भारतात 18 व्या शतकात एक शूर, कर्तबगार,हिम्मतवान तेजस्वी महिला माळवा प्रांतात महाराणी होऊन गेल्या. त्यांनी अनेक आपदांवर मात करीत मोठ्या हिंमतीने व बाणेदारपणे लोक कल्याणकारी राज्य कारभार केला. त्यांची तुलना जगातील राज्यकर्त्या महिलांसोबत करताना एक इंग्रज लेखक म्हणतो की “महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्यामध्ये रशियाची राणी कॅथरिन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विद्याधर चाबुकस्वार यांचा २१ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक आर.डी. भालेराव, नोरोजी वाडिया कॉलेज चे प्रिंसिपल डॉ वसंत चाबुकस्वार, यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मॉर्डन कॉलेज च्या प्राध्यापिका वैशाली चाबुकस्वार ,पुणे महानगर पालिकेचे अभियंता संदीप चाबुकस्वार, कुरुळी गावच्या उपसरपंच प्रतिभा ताई कांबळे, महाबोधी विहाराचे अध्यक्ष विजय जगताप , राहुल ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप जगताप, संकल्प पुष्पमाला चे सदस्य रमेश जाधव, प्रमोद गायकवाड, विलास कांबळे, बौद्धजन विकास मंडळ चे अध्यक्ष विलास पोळ, सारनाथ बुध्दविहार चे सदस्य नवनाथ मस्के , राजू भालेराव, अमित भालेराव , सामाजिक कार्यकर्त्या शोभा जगताप , विमल शिनगारे, सुषमा वाघमारे सामाजिक कार्यकर्ते निलेश भिसे , राजू…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना आणि राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये हरित सेतू उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत उद्या बुधवार दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजता आकुर्डी परिसरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षीही केंद्र शासनाच्या वतीने घरोघरी तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराध्यक्ष पदाबाबत अजित पवार हे अंतिम निर्णय घेतील. शहराला राज्यपाल नियुक्त आमदार मिळावा ही माझी इच्छा आहे. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा पूर्वीचा बालेकिल्ला आहे. मला आमदार किंवा खासदार व्हायचं नाही. पक्षवाढीसाठी प्रयत्न करत राहणार आहे असे युवा नेते पार्थ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये युवा नेते पार्थ पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक मयूर कलाटे, निलेश पांढारकर, फजल शेख, शेखर काटे, गोरक्ष लोखंडे, विजय लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पार्थ पवार म्हणाले,…
