चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने ‘रक्तदान महायज्ञ’

Spread the love
प्रत्येक रक्तदात्याला मिळणार ६ लाखांचे सुरक्षा कवच चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन
चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र्य दिनानिमित्त राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने ‘रक्तदान महायज्ञ’चे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला ६ लाखांचे सुरक्षा कवच देखील दिले जाणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जास्तीजास्त नागरिकांनी या रक्तदान महायज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘रक्तदान महायज्ञ’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ३ लाखांचा अपघाती विमा आणि ३ लाखांचा जीवन विमा देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्यास आजीवन मोफत रक्त देण्यात येणार असून रक्तदात्याच्या नातेवाईकास एक वर्ष मोफत रक्त देखील दिले जाणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघात १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत १) कोकण चौक रहाटणी, २) विठ्ठल रुक्मिणी मंदिर गावडे/ भोईर आळी चिंचवड, ३) पिंपरी चिंचवड मनपा शाळा वाकड, वाकड चौक, ४) मल्हार मार्केट विकासनगर मेन रोड, हॉटेल धनश्री जवळ किवळे, ५) प्रोबो प्रोलिक्स प्राईड शिंदे वस्ती रावेत, ६) सूर्यमुखी गणेश मंदिर, पडवळ नगर थेरगाव, ७) ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय साई चौक नवी सांगवी, ८) विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नढे नगर काळेवाडी, ९) तुळजाभवानी मंदिर शिवनगरी बिजली नगर चिंचवड या ठिकाणी हे रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. या रक्तदान शिबिराबाबत अधिक माहितीसाठी ८८०५०४५९९९ किंवा ८८०६०३६९९९ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button