भावी आमदार अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज वनश्री महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र, भावी आमदार अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी १४ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


या निमित्ताने बुधवार, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अरुण कन्स्ट्रक्शन ऑफिस, पिंपळे गुरव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात येणार आहे.
याच दिवशी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत नटसम्राट निळू फुले सभागृह, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव येथे “महाराष्ट्राचा मर्दानी बाणा” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर हे शाहिरी पोवाड्याद्वारे समाज प्रबोधन करणार आहेत.
या विशेष कार्यक्रमात समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत सेवाकार्य करणाऱ्या पाच मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. वृक्षमित्र अरुण पवार, बालाजी पवार आणि मित्रपरिवार यांच्या वतीने नागरिकांना आग्रहाचे निमंत्रण देऊन आपल्या मित्र परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











