- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
केंद्रीय राजभाषा समितीच्या संयोजकपदाचीही जबाबदारी खासदार बारणे यांच्याकडेच चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याचबरोबर केंद्रीय राजभाषा समितीच्या संयोजकपदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे. खासदार बारणे हे तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांना केंद्र शासनाच्या विविध समित्यांवर काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. यावेळीही दोन महत्त्वाच्या पदांवर बारणे यांची निवड झाल्याने विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोकसभेची ऊर्जा विभागाची स्थायी समिती विद्युत मंत्रालय आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अनुदान संबंधी मागण्यांवर विचार करते. ही समिती देशभरातील ऊर्जा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ इंद्रायणी थडी महोत्सवाला यावर्षीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवामघ्ये स्टॉल लावण्यासाठी महिला बचतगटांनी अवघ्या आठ दिवसांत ३ हजारांहून अधिक अर्ज घेतले आहेत. ‘‘महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता विकास’’ या उद्देशाने भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्ष पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी येथील गावजत्रा मैदानावर प्रतिवर्षी ‘‘इंद्रायणी थडी महोत्सव’’ आयोजित केला जातो. भोसरी आणि परिसरातील महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे. या करिता आयोजित केला जाणारा महोत्सव महाराष्ट्रातील सर्वाधिक उलाढाल आणि अफाट गर्दीचा म्हणून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (ACDRI) येथे वेल्डिंग प्रशिक्षण केंद्राच्या पहिला टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ऑटो क्लस्टरचे संचालक दिपक महिंद्रा, व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, अमित देसाई आदी उपस्थित होते. उत्पादन क्षेत्रातील कौशल्य विकास आणि नवकल्पना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. वेल्डींग प्रशिक्षण केंद्र आधुनिक TIG, MIG आणि ARC वेल्डिंग सुविधांनी सुसज्ज असून, मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योग (MSME)च्या कर्मचार्यांना वेल्डिंग तंत्रज्ञानात प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी तयार आहे. या केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सहभागींचे मूल्यांकन करून प्रमाणपत्र जारी करण्यात येणार असून, रोजगार क्षमता वाढणार आहे. या उपक्रमाद्वारे उद्योगात एक महत्त्वपूर्ण गरज पूर्ण होणार असून, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी उच्च-गुणवत्ता, परवडण्या योग्य प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर, बदलत्या उत्पादन क्षेत्रात स्पर्धा टिकविण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील कर्मचार्यांना आधुनिक वेल्डिंग कौशल्य प्रदान…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वच्छतादुतांमुळे शहर स्वच्छ राहते त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते तसेच महिला स्वच्छता कर्मचारी देखील स्वतःचे घर उत्तमरित्या सांभाळून शहराच्या स्वच्छतेमध्ये आपले योगदान देत असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छतेची पैठणी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वच्छतादुतांसाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारी पिंपरी चिंचवड महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली असल्याचे प्रतिपादन आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी केले. महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने…
खडकी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – खडकी शिक्षण संस्था स्वर्गीय चंद्रकांतजी छाजेड शिक्षक गौरव समारंभ खडकी दिनांक 24/9/2024 रोजी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खडकी परिसरातील 10 शाळेतील आदर्श शिक्षक शिक्षिका यांना या पुरस्काराच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष कृष्णकुमार गोयल ( अध्यक्ष ख, शि, संस्था ) यांच्या हस्ते ट्रॉफी शाल व श्रीफळ देऊन खडकी भागातील आदर्श शिक्षक शिक्षिका यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये ऑल सेट्स हाय स्कूल खडकी स्कूल च्या सुजाता साळवे यांना आदर्श शिक्षिका म्हणून गौरवण्यात आले. याप्रसंगी (प्राचार्य) डॉ संजय चाकणे , प्रा घाडगे (प्राचार्य) , डॉ आहेर , (सी ई…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “रयत शिक्षण संस्थेची स्थापना ४ ऑक्टोबर १९१९ रोजी सत्यशोधक समाजाच्या परिषदेत झाली असून कर्मवीर भाऊराव पाटील हे सत्यशोधकी विचारांचे कृतिशील उद्गाते आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर चे माजी कुलगुरू आणि महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. एस.एन. पठाण यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी,पुणे येथील महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज आणि कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३७ व्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कर्मवीर अण्णांनी सुरु केलेली ‘कमवा व शिका योजना’ बहुजनांसाठी जीवनदायी ठरली, असेही ते म्हणाले.…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्यलेखन – संशोधन आणि सामाजिक – सांस्कृतिक योगदानाचे सिंहावलोकन करण्यासाठी शनिवार आणि रविवार, दिनांक २८ आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न होणार्या या चर्चासत्राचे उद्घाटन ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी…
अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजन; विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने येथील एमआयटी एमआयटी आर्ट, डिझाइन, आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या या सामाजिक आवाहनाला विद्यार्थ्यांनीही उदंड प्रतिसाद देल्याने या शिबिरातून तब्बल १५० रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन समारंभात विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ.रामचंद्र पुजेरी यांच्या हस्ते तर डॉ. रजनीश कौर सचदेव बेदी, डॉ. विपुल दलाल, डॉ. वीरेंद्र शेटे, डॉ. सुदर्शन सानप, डॉ सूराज भोयर, एनसीसी समन्वयक मेजर सुमन कुमारी, एनएसएस समन्वयक प्रा.विशाल पाटील, प्रा. डॉ. हनुमंत पवार,…
बांधकामाच्या दुसऱ्या टप्प्यात मजले बांधण्यावर लक्ष केंद्रित करणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून आतापर्यंत या इमारत बांधकामाचे महत्वाचे टप्पे गाठले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हेतू सर्व महापालिका कार्यालयांना एकाच छताखाली केंद्रित करणे, नागरिकांना अधिकाधिक सेवा अधिक सुलभ पद्धतीने पुरविणे आणि एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करणे हा आहे. इमारत उभारण्यासाठीचे खोदकाम, पाया आणि तळघराच्या पातळीचे काम पूर्ण झाले असून आता सध्या तळमजला बांधण्याचे काम सुरू आहे. इमारतीचे काम पुर्ण झाल्यावर नवीन सुविधांमध्ये नागरिक सेवा केंद्र, बहुउद्देशीय हॉल आणि ई-गव्हर्नन्स केंद्र यांसारख्या सार्वजनिक सुविधांचा समावेश असणार आहे, ज्यामुळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गायरान येथे बायोडायव्हर्सिटी पार्क तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती निर्मिती करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी बॉलीवूड पार्क आणि वर्ल्ड पार्क विकसित करण्यात येणार आहे. या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात आज महापालिका स्थायी समिती बैठक पार पडली. यावेळी महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी प्रशासक सिंह यांनी विविध विषयांना मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. तळवडे गायरान येथे सुमारे ६० एकर जागेत बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्यात येणार आहे. जैवविविधतेचे संवर्धन ही…
