ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरी

शनिवारी पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या सांस्कृतिक योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्यलेखन – संशोधन आणि सामाजिक – सांस्कृतिक योगदानाचे सिंहावलोकन करण्यासाठी शनिवार आणि रविवार, दिनांक  २८ आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न होणार्‍या या चर्चासत्राचे उद्घाटन ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता होणार असून ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, मुंबई विद्यापीठ लोककला विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. राजेंद्र विखेपाटील, प्रा. डॉ. नितीन घोरपडे, प्रा. डॉ. देवीदास वायदंडे, डॉ. धोंडीराम पवार, डॉ. संदीप पालके, बागेश्री मंठाळकर, सागर वैद्य, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. संगीता जगताप, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, लेखाधिकारी डॉ. चारुशीला गायके, सीनेट सदस्य कृष्णा भंडलकर, मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, भारतीय लोककला अभ्यास संशोधन संचालक डॉ. प्रवीण भोळे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
उद्घाटन सत्रानंतर डॉ. प्रभाकर मांडे यांची लोकरंगभूमी मीमांसा, डॉ. मांडे यांचे मौखिक वाड्.मय परंपराविषयक लेखन, डॉ. मांडे यांच्या वाड्.मयाबाहेरील समाज व लोकमानसविषयक आकलन, डॉ. मांडे यांचे लोकसाहित्य, लोकपरंपरा आणि लोकमानस संकल्पना, डॉ. प्रभाकर मांडे यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित प्रकट मुलाखत, लोककलांचे सादरीकरण ही सत्रे संपन्न होतील.
रविवार, दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० वाजेपासून डॉ. मांडे यांची लोककला व अभिजात रंगभूमीविषयक भूमिका, भारतीय संस्कृती आणि डॉ. मांडे यांचे साहित्यलेखन, भारतीय शिक्षण परंपरा आणि डॉ. मांडे यांचे साहित्यलेखन, डॉ. मांडे यांचे साहित्यलेखन आणि अस्मिता जागरण या परिसंवादांच्या माध्यमातून विविध व्यासंगी, तज्ज्ञ आणि अभ्यासक ऊहापोह करतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखालील समारोप सत्रात पद्मश्री रमेश पतंगे समारोपपर भूमिका विशद करतील. विनाशुल्क असलेल्या या सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे व कार्यवाह ॲड. सतिश गोरडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button