Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा हे उद्योग विश्वातील एक रत्न होते. टाटा समूहाची धुरा त्यांनी उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवर स्वीकारली. उद्योगांना लायसन्स राज मधून बाहेर काढत प्रगती पथावर नेले. एकूण बेचाळीस कंपन्या चालवत सॉल्ट ते सॉफ्टवेअर अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी भरारी घेतली. यातील सर्व उद्योग हे केवळ नफ्यासाठी न चालवता राष्ट्राच्या उभारणीस हातभार लावला. समाजाभिमुखता, साधी राहणी, दातृत्व, देशप्रेम अशा विविध गुणांचा समन्वय साधणारा एक मोठ्या मनाचा माणूस आपण गमावलेला आहे. रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व हे सर्वव्यापी होते . समाजातील सर्व स्तरावरील लोकांच्या आदरास प्राप्त झालेले होते. त्यांचे श्वानप्रेम आणि भूतदया ही सर्वश्रुत आहे. कामगार त्यांना…

Read More

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ संचालित      पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांच्या वर्गणीतुन थेरगांव येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ संचालित स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन उभारण्यात आले आहे. सदर कामगार भवनाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.        पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वर्ग-१ ते वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाकरीता सद्यस्थितीत जो अफाट खर्च होतो त्यामुळे महागाईच्या काळात कर्मचारी कर्जात बुडून जातो व त्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली जाते. यावेळी अनेक छोटे-मोठे समारंभ होत असतात. अशा…

Read More

– फेरीवाला निवडणुकीच्या निमित्ताने संघटनेचा जाहीरनामा प्रसिद्ध – संघटनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा : बाबा कांबळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शहर फेरीवाला समितीसाठी आठ सदस्य निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये शहरातील नोंदणीकृत फेरीवाले यांना प्रत्येकी आठ मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकाराचा वापर करून संघटनेचे ८ उमेदवार बहुमताने निवडून द्या, असे आवाहन टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांना केले. तसेच संघटनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा, असेही बाबा कांबळे म्हणाले. निवडणुकीच्या निमित्ताने संघटनेने जाहीरनामा प्रसिद्ध केला. या वेळी बाबा कांबळे बोलत होतो. पिंपरी…

Read More

महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पालकांचा सहभाग वाढवून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणासाठी डी.बी.टी अंतर्गत ई-रुपी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळाची गरज असते. असे मनुष्यबळ सहज उपलब्ध व्हावे तसेच युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्पादनाभिमुख ट्रेड्सचे प्रशिक्षण देण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम, मिशन शिष्यवृत्ती, शिक्षक सक्षमीकरण, सक्षम आदी उपक्रम राबविण्यात येत असून अध्यापनात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची आवड निर्माण करण्यात येत आहे. तसेच विविध उपक्रमांद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेने इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ग. दि. माडगूळकर नाट्यगृह प्राधिकरण येथे नवरात्रीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी नवरात्री उत्सवाचे महत्व सांगितले, त्या म्हणाल्या की, नवरात्री हा आदिशक्तीचा उत्सव आहे, नारी सन्मान ही आपली संस्कृती आहे, आदिशक्ती ही सर्व विश्वाची जननी आहे. तो धागा पकडून उपासना करायची आहे ह्याची जाणीव करून दिली जाते. पावसाळा संपून अन्नधान्य पिकलेले असते, आपल्या हिंदू धर्मात सर्व उत्सव कृषी संस्कृतीशी सबंधित आहेत. अहोरात्र काम करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण महिला या उत्सवात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित गंगोत्री पार्क येथील रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात झाली. महानगरपालिका स्थापत्य विभागाकडून तात्काळ दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनंतर या कामाला गती मिळाली असून, वाहनचालक व स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भोसरी-दिघी रस्ता गंगोत्री पार्क या सोसायटीच्या कॉर्नरपर्यंत सुमारे १८ मीटरचा आहे. सदर रस्ता पुढे बंद आहे. २००५ ते २०१० दरम्यान रस्त्याच्या बाजुला प्लॉटिंग करुन विकले आणि काही ठिकाणी गृहप्रकल्प बांधून विकण्यात आला. सोसायटी उभारण्यात आल्या. त्यामुळे रस्ता ‘बॉटलनेक’ झाला आहे. भोसरीतून दिघीला जाणारा जवळचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संघटनात्मक मोर्चेबांधणीमध्ये भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा आघाडीवर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने संघटनावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मंडल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. दिघी-मोशी-चऱ्होली  मंडल पदाधिकाऱ्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने संघटनात्मक मोर्चेबांधणी करून या संघटनाच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाण्याचे भाजपाचे धोरण आहे.त्यानुसार बुधवारी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते दिघी-मोशी,-चऱ्होली मंडल पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. दिघी, मोशी, चऱ्होली मंडल अध्यक्षपदी संतोष भाऊसाहेब तापकीर, सरचिटणीसपदी रवींद्र तापकीर, सौरभ हगवणे, प्रमोद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कवयित्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, सूत्रसंचालिका, वार्ताहर आणि स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा असे सविताताईंच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. त्यांचा जन्म सोलापूर येथे सौ.रुक्मिणी आणि भगवानराव व्हटकर या दांपत्याच्या घरी झाला. आईवडिलांना शिक्षणाची व वाचनाची आवड असल्याने लेखनवाचनाचे उत्तम संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांचे आई-वडील तसेच प्रेमळ आणि शिस्तप्रिय आत्या शैला शिंदे यांनी सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली. दोन भाऊ आणि एक बहीण यांच्यासोबत हसत खेळत त्यांचे बालपण गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौसेनेत कार्यरत असलेल्या उमद्या व्यक्तिमत्वाच्या श्री. मल्लिकार्जुन इंगळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतींच्या नौसेनेतील नोकरीमुळे, लग्नानंतर साधारणपणे बारा वर्षे…

Read More

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – “व्यवसाय करताना पैसा कमावणे अपेक्षित आहेच; परंतु वकिलांनी त्याचबरोबर माणुसकी ठेवून गरीब, निष्पाप आणि अल्पवयीन आरोपींना न्याय मिळवून देताना संवेदनशीलता जोपासावी!” असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ आणि दर्द से हमदर्द तक या संस्थेचे संस्थापक ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी पुण्यात  केले. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना षष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद – विधी प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि दर्द से हमदर्द तक ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कौटुंबिक समुपदेशन व बालगुन्हेगार’ या विषयावरील अभ्यासवर्गात वकील आणि कार्यकर्ते यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ॲड. प्रकाश साळशिंगीकर बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक ॲड.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  भारताच्या उद्योग जगताचे पितामह पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यामुळे देशभरातील उद्योग क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर व रतन टाटा यांचे भावनिक स्नेह संबंध होते. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशन व धानोरे येथील इंद्रायणी इंडस्ट्रियल तसेच सायन्स पार्कशी सहयोगी विविध संस्थांच्या वतीने शुक्रवारी, (दि. ११) सायंकाळी ५:३० वाजता तारांगण सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील उद्योजक, कामगार तसेच विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागरिकांनी उपस्थित रहावे असे…

Read More