ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरी

स्व. रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सायन्स पार्कमध्ये आज सभा 

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  भारताच्या उद्योग जगताचे पितामह पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यामुळे देशभरातील उद्योग क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर व रतन टाटा यांचे भावनिक स्नेह संबंध होते. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशन व धानोरे येथील इंद्रायणी इंडस्ट्रियल तसेच सायन्स पार्कशी सहयोगी विविध संस्थांच्या वतीने शुक्रवारी, (दि. ११) सायंकाळी ५:३० वाजता तारांगण सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील उद्योजक, कामगार तसेच विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांनी केले आहे.
    देशातील विविध उद्योग जगताबरोबरच रतन टाटा यांचा परिसस्पर्श विविध सामाजिक ट्रस्ट, शैक्षणिक व संशोधन संस्था, संघटनांना लाभला आहे. पिंपरी चिंचवड मनपा निर्मित सायन्स पार्कच्या निर्मितीतीत टाटा यांचे उल्लेखनीय योगदान आहे. यामध्ये विविध प्रदर्शन कक्षांच्या, विशेषतः ऑटोमोबाईल या कक्षाच्या जडणघडणीत टाटा मोटर्सचे, तसेच कल्पकघर या आयसर पुणे व सायन्स पार्कच्या संयुक्त उपक्रमास टाटा टेक्नोलॉजीज यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. रतन टाटा यांनी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेच्या माध्यमातून सायन्स पार्क येथे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन कक्ष प्रेक्षकांसाठी उभारला आहे अशी माहिती सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button