- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभेमध्ये अनेक घटक राहत असतात. त्या प्रत्येक घटकाला काय हवे हे तळागाळातून तसेच वैचारिक उंची असलेल्या लोकांकडून एकत्रित आणण्याचे एक साधन म्हणजे व्हिजन डॉक्युमेंट. पिंपरी विधानसभेमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत तसेच इथल्या रहिवाशांना नवीन काय देता येईल हे जाणून घेण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट 2024 हा कार्यक्रम घेण्यात आला. पिंपरी मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले देवेंद्र तायडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी व्हिजन डॉक्युमेंटच्या पाठीमागची संकल्पना सरचिटणीस प्रा.जयंत शिंदे यांनी मांडली. पिंपरी चिंचवड शहराचे निरीक्षक आणि महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रकाशअप्पा म्हस्के म्हणाले की चंदीगड शहरासारखा विकास पिंपरी विधानसभेत झाला पाहिजे. यावेळी पक्षाचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे: – महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार असून राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यामध्ये २३४ सर्वसाधारण मतदारसंघ असून २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर २९…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती, महासंघ कष्टकरी संघर्ष महासंघ या संघटनाच्या माध्यमातून शहरातील कष्टकरी वर्ग, पथारी, हातगाडी, टपरीधारक यांच्या न्यायहक्काची लढाई आम्ही लढलेली आहे. आमच्या लढाईमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हॉकर्स झोन निर्माण केले तर ६५ ठिकाणी हॉकर झोन प्रस्तावित असून २०१४ नंतर ५९०० विक्रेत्यांना फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यापुढेही खूप मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी सर्व पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी आपल्या संघटनेच्या सर्व उमेदवारांना कपबशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले. पिंपरी चिंचवड…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “समाज दूतांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे” अशी अपेक्षा प्रतिभा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व जेष्ठ साहित्यिक आणि अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ राजेंद्रजी कांकरीया यांनी व्यक्त केली. निगडी येथील “सृजन प्रतिष्ठान” या संस्थेने आयोजित केलेल्या ‘समाज दूत’पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात डॉ कांकरिया अध्यक्ष म्हणून बोलत होते.या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार आणि मावळ ऑनलाईन वेब पोर्टलचे संस्थापक विवेक इनामदार विशेष अतिथी तर बीना एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. आझम खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ कांकरिया यांनी वडीलांचे पुण्य स्मरण करण्याच्या या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले . हा कार्यक्रम आकुर्डी बीना इंग्लीश मिडीयम स्कूलच्या…
पीसीसीसोईआर येथे ‘एशियाकॉन २०२४’ आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारत हा युवकांचा देश असून संशोधनातून समाज बदल घडवणे शक्य आहे. याचा फायदा भारतासारख्या विकसनशील देशाने करून घेतला पाहिजे. जागतिक पातळीवर भारताची आर्थिकदृष्ट्या बाजू सक्षम होईल, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. शंकर देवसरकर यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च, रावेत (पीसीसीसोईआर) येथे ‘एशियाकॉन २०२४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश शिरबहादुरकर, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडी महामेट्रो मार्गिका क्र.अ च्या कामास पिंपरी चिंचवड महापालिकेचा हिस्सा अदा करण्याबाबतच्या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. भारत सरकारच्या मान्यतेनुसार…
– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा – पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात आणखी एक मानाचा तुरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारतीय लोकशाहीचा पाया संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती व्हावी. या करिता देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात आहे. त्याची पायाभरणी आज झाली. संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांना अभिमान वाटावा, असे संविधान भवन उभारले जाईल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या पेठ क्रमांक 11 मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र…
चिन्मय मिशन आंतरशालेय गीता पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “गीता कधीही कालबाह्य होत नाही!” असे प्रतिपादन सज्जनगड येथील अजेयबुवा रामदासी यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त चिन्मय मिशन, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवद्गीता पाठांतर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात अजेयबुवा रामदासी बोलत होते. चिन्मय मिशन, पुणेच्या आचार्य ब्रह्मचारिणी मैत्रेयी चैतन्य, पिंपरी – चिंचवड विभागाचे अध्यक्ष हेमंत गवंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. हेमंत जोशी यांनी प्रास्ताविकातून, “चिन्मय मिशन, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवद्गीता पाठांतर स्पर्धेत एकूण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कासारवाडी येथील ज्येष्ठ समाजसेवी श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री डॉ अशोककुमार पगारिया आणि कासारवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे कार्याध्यक्ष श्रेयस अशोककुमार पगारिया या पिता पुत्रांना नवचैतन्य सामाजिक संस्था चिखली या संस्थेने आदर्श पिता पुत्र समाज भूषण पुरस्कार नुकताच आळंदी येथील जैन स्थानकाच्या सभागृहामध्ये आनंद शिष्यरत्न ,प्रवचन प्रभाकर, परमपूज्य प्रशांत ऋषीजी आणि परमपूज्य विजय स्मिताजी म सा यांच्या सानिध्यात प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा अनिता नहार , आळंदी संघाचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर ,ज्येष्ठ समाजसेवी कांतीलालजी मुनोत, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुवालालजी बोरा आदि मान्यवरांच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – धामणी येथील संत सावता माळी प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने कळमजाई देवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले जातात. यावर्षी उद्योग क्षेत्रातील विशेष पुरस्कार धामणी आणि कासारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री विलास कुमार नेनसुख पगारिया यांना आदर्श उद्योजक या पुरस्काराने धामणी येथे सन्मानित करण्यात आले .या पुरस्कारा निमित्त त्यांना शाल, श्रीफळ, आणि, सन्मानपत्र , सन्मानचिन्ह संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर विधाटे आणि कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब हिवरकर आणि शांताराम जाधव यांच्या हस्ते देण्यात आले .विलासकुमार पगारिया यांचे परिवार सदस्य ही यावेळी उपस्थित होते , विलास कुमार पगारिया ह्यांनी जैन सोशल ग्रुप…
