ताज्या घडामोडीपिंपरी
संशोधनातून समाजबदलाची नांदी – डॉ. शंकर देवसरकर
पीसीसीसोईआर येथे ‘एशियाकॉन २०२४’ आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारत हा युवकांचा देश असून संशोधनातून समाज बदल घडवणे शक्य आहे. याचा फायदा भारतासारख्या विकसनशील देशाने करून घेतला पाहिजे. जागतिक पातळीवर भारताची आर्थिकदृष्ट्या बाजू सक्षम होईल, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. शंकर देवसरकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च, रावेत (पीसीसीसोईआर) येथे ‘एशियाकॉन २०२४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश शिरबहादुरकर, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी आदी उपस्थित होते.
डॉ. महेश काकडे यांनी “बदल, आव्हाने व उपलब्ध संधी” यांची योग्य सांगड घालून संशोधना करीता आवश्यक वातावरण निर्मिती केली जाऊ शकते, असे सांगितले.
डॉ. सुरेश शिरबहादुरकर यांनी “संशोधनामधील शिक्षकांची बदलती भूमिका” याकडे लक्ष वेधले. या आंतरराष्ट्रीय परिषदे करिता २३०९ शोधनिबंध आले होते त्यापैकी ३०३ शोधनिबंधांची अंतिम निवड करण्यात आली.
स्वागत प्राचार्य डॉ. हरीश तिवारी व प्रास्ताविक डॉ. राहुल मापारी यांनी तर प्रा. विजयालक्ष्मी कुंभार यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी परिषदेस शुभेच्छा दिल्या.