पिंपरी विधानसभेचे व्हिजन डॉक्युमेंट, 2024साठी देवेंद्र तायडे यांचा पुढाकार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभेमध्ये अनेक घटक राहत असतात. त्या प्रत्येक घटकाला काय हवे हे तळागाळातून तसेच वैचारिक उंची असलेल्या लोकांकडून एकत्रित आणण्याचे एक साधन म्हणजे व्हिजन डॉक्युमेंट.
पिंपरी विधानसभेमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत तसेच इथल्या रहिवाशांना नवीन काय देता येईल हे जाणून घेण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट 2024 हा कार्यक्रम घेण्यात आला. पिंपरी मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले देवेंद्र तायडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी व्हिजन डॉक्युमेंटच्या पाठीमागची संकल्पना सरचिटणीस प्रा.जयंत शिंदे यांनी मांडली.
पिंपरी चिंचवड शहराचे निरीक्षक आणि महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रकाशअप्पा म्हस्के म्हणाले की चंदीगड शहरासारखा विकास पिंपरी विधानसभेत झाला पाहिजे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांदे म्हणाले की, पिंपरी विधानसभा हा फक्त महाराष्ट्रापुरता विषय नाही तर पिंपरी विधानसभा हा दिल्ली ते गल्ली जोडणारा विषय आहे. आपल्याला पुरोगामी विचार दिल्ली ते गल्लीतल्या घराघरात पोहोचवायचे आहेत.
राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले की, महायुतीचे सरकार भ्रष्टाचार कशी करते हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. कामगार नेते अजित अभ्यंकर म्हणाले की शहरात बांधकाम क्षेत्राच्या एफएसआय वर मर्यादा आणल्या पाहिजेत.
कामगारांच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये सुख सुविधांवर होणारा खर्च होणारा खर्च दुप्पट केला पाहिजे कारण तेवढे पैसे ईएसआय कडे पडून आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, सरचिटणीस शकुंतला भाट,मुख्य प्रवक्ते माधव पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव आणि सचिव प्रमोदिनी लांडगे यांनी केले होते.
यावेळी पक्षाचे विजयकुमार पिरंगुटे, सुदाम शिंदे,विशाल काळभोर, केडी वाघमारे,संजय पडवळ,ज्योती जाधव, संजीवनी पुराणिक,रेखा मोरे, पोपट पडवळ,शौल कांबळे,रजीना फ्रँसीस,कविता कोंडे,रोहित जाधव, विवेक विधाते,अजय पिल्ले, सुशांत खुरासने,अक्षय घोडके,सुशील घोरपडे आदी उपस्थित होते. काशिनाथ जगताप यांनी मानले.