जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक विलासकुमार पगारिया यांना आदर्श उद्योजक पुरस्कार प्रदान
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – धामणी येथील संत सावता माळी प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने कळमजाई देवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले जातात. यावर्षी उद्योग क्षेत्रातील विशेष पुरस्कार धामणी आणि कासारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री विलास कुमार नेनसुख पगारिया यांना आदर्श उद्योजक या पुरस्काराने धामणी येथे सन्मानित करण्यात आले .या पुरस्कारा निमित्त त्यांना शाल, श्रीफळ, आणि, सन्मानपत्र , सन्मानचिन्ह संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर विधाटे आणि कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब हिवरकर आणि शांताराम जाधव यांच्या हस्ते देण्यात आले .विलासकुमार पगारिया यांचे परिवार सदस्य ही यावेळी उपस्थित होते , विलास कुमार पगारिया ह्यांनी जैन सोशल ग्रुप पुणे आनंद चे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कामगिरी केली आहे सध्या ते ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य असून श्री लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक चे संचालक, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि पार्श्वनाथ क्रीडा मंडळाचे विश्वस्त म्हणूनही काम करीत आहेत.
विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी त्यांच्या कामगिरीचा ठसा उमटवून नावलौकिक संपादन केला आहे. त्यांना त्यांचे थोरले बंधू जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ अशोककुमार पगारिया यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ मंगल पगारिया, पूत्र विपुल,स्नूषा तेजस्वी पगारिया यांचे सहकार्य लाभत आहे