- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे पार पाडणार आहे. या मतमोजणीसाठी २९ टेबल लावण्यात येणार असून उमेदवारांनी टेबलनिहाय मतमोजणी प्रतिनिधीची नेमणूक करावी. नेमणूक करण्यात आलेल्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ओळखपत्र देण्यात येतील. तसेच वैध्य ओळखपत्राशिवाय कोणासही मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिल्या. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांच्या विशेष उपस्थितीत उमेदवार, प्रतिनिधींसमवेत बैठक…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कार्यालयीन वेळेत मोबाईलच्या अतिवापरामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने कंत्राटी मनुष्यबळाने निर्धारीत कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरू नये, असे आदेश पीएमआरडीएमध्ये लागू करण्यात आला आहे. बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत घेतलेल्या कंत्राटी मनुष्यबळाने संबंधित आदेश लागू असून त्याची अंमलबजावणी कंत्राटी एजन्सीने सुरू केली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात ४०७ पदांचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. या मंजूर आकृतीबंधातील प्रतिनियुक्तीसह आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीची पदे शासनाकडून उपलब्ध होईपर्यंत तसेच सरळसेवेच्या पदांची बिंदू नामावली मंजूर होऊन सदरील पदे एमपीएससी व जिल्हा निवड समितीमार्फत भरती करण्यास काही कालावधी अपेक्षित आहे. संबंधित पद भरती होईपर्यंत पीएमआरडीएने बाह्यस्तोत्र एजन्सी नियुक्त…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गझलपुष्प कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेचा सहावा वर्धापनदिन सोहळा रविवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी ४:३० या वेळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे, पिंपरी येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गझलकार डॉ. शिवाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या या सोहळ्याचे उद्घाटन भाजपा मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या हस्ते होणार असून उद्योजक संजॉय चौधरी आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती राहील. सोहळ्यात ज्येष्ठ गझलकार बदीऊज्जमा बिराजदार उर्फ साबीर सोलापुरी यांना गझलपुष्प पुरस्कार २०२४ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असून नीलेश शेंबेकर लिखित ‘क्षितिजापल्याड’ आणि संदीप…
मतदान केंद्राच्या आवारातच भाजपची भिंतीवर रंगवलेली जाहिरात ठरली अपवाद निवडणूक विभागावरच थेट पोलिसांनी खटला दाखल करावा शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांची मागणी चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवडगावातील मतदान केंद्राच्या अगदी जवळच असणाऱ्या भाजपच्या जाहिरातीमुळे निवडणूक विभागाच्या पारदर्शक कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग अजूनही धृतराष्ट्राच्याच भूमिकेत असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मतदानाच्या दिवशीच हा प्रकार निदर्शनास आल्यामुळे निवडणूक विभागाकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे निवडणूक विभागावर पोलिसांनी थेट खटला दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे चिंचवडचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात सौदणकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा दावा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे. २०१९-२४ या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर जनेतेने टाकलेला विश्वास आमच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण आहे. महायुती सरकारने केलेली विकासकामे, लाडकी बहीण योजना तसेच जनकल्याणकारी विविध योजना यामुळे मतदारांना दिलासा मिळाला. शहरातील मेट्रोचा निगडी पर्यंतचा विस्तार याच बरोबर मनपाचे विविध प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यामधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. मतदारसंघातील झोपडपट्टी तसेच मध्यमवर्गीय व सोसायट्यांमधील नागरिकांशी मी वैयक्तिक संपर्कात आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यावर माझा भर असतो. प्रत्येक घटक तसेच सर्वसामान्य मतदारांचा माझ्यावर…
भोसरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघात ६१.१४ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये भोसरी विधानसभेत ६५.६१ टक्के एवढे मतदान झाले होते. आता मतदानचा घसरलेला टक्का नेमका कोणाच्या फायद्याचा ठरणार हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे. भोसरी विधानसभेत महायुतीचे महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांच्यात थेट लढत झाली होती. ही लढत अत्यंत चुरशीची ठरली होती. ६१.१४ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती सूतकडून मिळत आहे. दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ६५.६१ टक्के एवढे मतदान झाले होते आता झालेले कमी मतदान नेमके कोणाच्या फायद्याचे ठरणार हे शनिवारी दि. २३…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे कमी मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. या निवडणुकीत ५१.२९ टक्के एवढे मतदान झाले आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभेत पुन्हा अण्णा बनसोडे आमदार होणार की सुलक्षणा शिलवंत यांची लॉटरी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ४.०४ एवढे मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत ११.४६ टक्के मतदान, दुपारी १ वाजेपर्यंत २१.३४ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत ३१.५८ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.३६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि महाविकास आघाडीचे सुलक्षणा शिलवंत…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला दिसणारी तिरंगी लढत मात्र दुरंगीच झाल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांच्यातच थेट सामना झाला असल्यास बोललं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात जगताप पॅटर्न चालणार की कलाटे बाजी मारणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सरासरी ५६ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.८० टक्के एवढे मतदान झाले आहे. तर ११ वाजेपर्यंत १६.९७ टक्के मतदान झाले होते. दुपारी १ वाजेपर्यंत २९.३४ टक्के…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड गावातील ज्येष्ठ नागरिक प्रमिला सदाशिव कुलकर्णी यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पिंपरी, काळेवाडी येथील मनपा शाळा क्रमांक ५६/२ येथे मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. प्रमिला कुलकर्णी यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मी आतापर्यंत महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी आवर्जून मतदान केले आहे. तसेच विवाहपूर्वी माझ्या माहेरी केळवडे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूकित देखील मतदान केले आहे. आज वयाच्या ८५ व्या वर्षी याचे समाधान वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दूरदृष्टीचे नेतृत्व सलग तीन वेळा पंतप्रधानपद भूषवित आहेत. तसेच महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्याची भूमिका घेणारे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अश्विनी जगताप, कुटुंबातील सदस्य तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही बळकट करण्यासाठी चिंचवड विधानसभेतील जास्तीत जास्त मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन शंकर जगताप यांनी केले.
