- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– कुदळवाडीतील आगीच्या पार्श्वभूमीवर होणार ‘फास्ट ट्रॅक’वर कारवाई पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली-कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनासह अन्य सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा आणि कारवाई सुरू करावी, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली. चिखली-कुदळवाडी येथे सोमवारी पहाटे भंगार दुकांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या दुर्घटनेमध्ये १५ ते २० दुकाने खाक झाल्याचे वृत्त आहे. मुंबईमध्ये राज्य सरकारचे विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार महेश लांडगे यांनी या मुद्याकडे…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दोन दिवसीय ई-आंतरराष्ट्रीय परिषद “थिन फिल्म डेपोझिशन, कॅरॅक्टरायझेशन आणि अप्लिकेशन्स” (E-TDCA-2024) उत्साहाने ५ डिसें., रोजी सुरू झाली होती. भारत, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन,संयुक्त अरब अमिरात इ.विविध देशांमधून सुमारे १५०हून अधिक संशोधक उपस्थित होते. पैकी ७० सहभागी सादरीकरण स्पर्धेत होते, त्यापैकी १० स्पर्धकांना उत्कृष्ट म्हणून गौरविण्यात आले. या वर्षीचा युवा संशोधकांसह महिला वैज्ञानिकांचे,सहसंयोजकांचे कौतुक करण्यात आले आणि विशेष पुरस्कार देण्यात आले. प्रो. सी. डी. लोखंडे एंडोमेंट चॅरिटेबल ट्रस्टची फेलोशिप रु. ५०,०००/- श्री. संदेश गायकवाड, (निझरे,जावली- सातारा) पीएच.डी. विद्यार्थी, जो सध्या आपल्या पीएच.डी.साठी संशोधन करत आहे, यांना दिले गेले. प्रतिष्ठित आजीवन कार्य पुरस्कार डॉ. इम्तियाज…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिना निमीत्त वूई टुगेदर फाउंडेशन च्या वतीने केशवनगर चिंचवड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.बुद्ध वंदना घेण्यात आली. फाउंडेशनचे सल्लागार मधुकर बच्चे यांनी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाण्याने जनतेवर झालेला आघात ,झालेले दुःख व त्यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद यांनी बाबासाहेबांची जगभर असलेली ख्याती,त्यांनी समाजात केलेला बदल, तसेच भारताला दिलेले संविधान याविषयीं सविस्तर माहिती दिली. या वेळी सलीम सय्यद,मधुकर बच्चे, जयंत कुलकर्णी दिलीप चक्रे, रवींद्र काळे,गणेश बच्चे, सदाशिव गुरव, श्रीनिवास जोशी अनिल पोरे, शंकर राव कुलकर्णी ,मोहम्मद शेख, अर्जुन पाटोळे,पोपट…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर(श्री. भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट) निगडी प्राधिकरण यांच्या वतीने येत्या ११ ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव तथा विश्वशांती महायाग याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परमपूज्य श्री १०८ अमोघकीर्तीजी महाराज आणि परमपूज्य श्री १०८ अमरकीर्तीजी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २७- अ नियोजित महापौर निवास मैदान, सिटी प्राइड शाळेजवळ भेळ चौक येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाच्या या पाच दिवसांमध्ये गर्भ कल्याणक, जन्म कल्याणक, राज्याभिषेक व दीक्षा कल्याणक, केवलज्ञान कल्याणक आणि निर्वाण मोक्षकल्याणक असे कार्यक्रम होतील.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका सुरूच आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी रविवारी ( दि. 8) शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. थेरगाव येथे झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे, युवा सेनेचे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख माऊली जगताप, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष रोहित बांगर यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रविंद्र शेलार, प्रत्रिक म्हातो, कुणाल खताडे, महेश भोसले, मंगेश विजयकर, अमित दिवाकर, तुषार डेरवणकर,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज संपूर्ण महाराष्ट्रात सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदू नागरिकांवर होणाऱ्या प्रचंड अत्याचाराच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक चौकात जन आंदोलन करण्यात आले. जसे १९४७ आपल्या हिंदूस्थान ची फाळणी झाली आणि पाकिस्तान ची निर्मिती झाली त्या वेळी त्या पाकिस्तानात संपूर्ण सिंध प्रांत आणि पंजाब चा काही भाग गेला आणि तेथील कट्टर पंथीय मुस्लिमांनी असेच सिंधी आणि पंजाबी नागरिकांवर अत्याचार केले होते पण त्या वेळी तेथुन निघुन हिंदूस्थानात प्रस्थापित झालेला सिंधी बांधव आज या आंदोलनात पिंपरी येथील शगुन चौकात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता यामध्ये प्रामुख्याने सिंधी समाजातील प्रतिष्ठित नागरिक मनोहर जेठवानी, महेश मोटवानी, तुलसीदास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर येथे बनविण्यात येणऱ्या योगा पार्कच्या विकास कामाची पाहणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपाचे अति. आयुक्त प्रदिप जांभळे पाटील व अधिकरी यांच्या समवेत पाहणी केली. नागरिकांसाठी विविध सोयीसुविधायुक्त असे योगा पार्क साकारण्यात येत आहे, यामध्ये १८ मीटर उंचीची बोल्डरिगं वॅाल, २१ मीटर स्पीड वॅाल, २१ मीटर लीड वॅाल, लहान मुलासाठी विविध खेळणी प्रकार, जेष्ठासाठी बैठक व्यवस्था, स्वतंत्र योगा व्यायामासाठी व्यवस्था, वॅाकीग ट्रॅक, प्रशस्त गार्डन व्यवस्था बनविण्यात आली आहे, या योगा पार्क मधे बनविण्यात आलेली क्लायबिगं वॅाल ही अशिया मधील सर्वात मोठी वॅाल आहे, या वॅाल मध्ये सराव करणारे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दूरदृष्टीकोनातून शहरवासियांच्या सोयीसाठी दिव्यांग भवन,वेस्ट टू एनर्जी यासारखे सुरू केलेले अनेकविध स्तुत्य उपक्रम आणि प्रकल्प अनुकरणीय आहेत असे मत पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्प, उपक्रम आदी ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी भेट दिली, यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या बोलत होत्या. महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीच्ची आढावा बैठक महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत देखील श्रीमती आव्हाळे यांनी सहभाग घेऊन इमारतीची…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “मानवतावाद हाच सर्वोच्च धर्म हे ब्रीद आचरणात आणून पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार या गावाला आशिया खंडाच्या नकाशावर अग्रस्थानी आणले!” असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी यशवंतराव चव्हाण ट्रेनिंग सेंटर, आदर्शगाव हिवरेबाजार, जिल्हा अहिल्यानगर येथे व्यक्त केले. पिंपरी येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच कृषिभूषण सुदाम भोरे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या…
