युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश,खासदार श्रीरंग बारणे यांनी केले पक्षात स्वागत


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका सुरूच आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी रविवारी ( दि. 8) शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.



थेरगाव येथे झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे, युवा सेनेचे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख माऊली जगताप, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष रोहित बांगर यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रविंद्र शेलार, प्रत्रिक म्हातो, कुणाल खताडे, महेश भोसले, मंगेश विजयकर, अमित दिवाकर, तुषार डेरवणकर, अतिश चिखलकर, नितेश सकपाळ, किशोर जाधव, शुभम सोनावणे आकाश वाल्मीकी, आकाश शेलार, किरण पाले, संजय जाधव, रवींद्र कुंवर, राजेंद्र निकम, राजेंद्र गिरासे, मुरार अहिरराव, गौतम बागुल, प्रल्हाद सुरेश पाटील,शरद सोनवणे, दिपक पाटील, किरण जाधव, विठ्ठल सोनगीर,राहुल पाटील, रोहित पाटील, वैभव माळी, रितेश चौधरीभुषण खैरनार, जयवंत विघे, मयूर जैस्वाल, जितेश पाटील,सौरभ पाटील, देवेंद्र सईंदाने, देवदत्त सावंत, नरेंद्र पाटील,भुषण पाटील, संदीप जगताप, परेश पाटील, सतीश पाटील,प्रेमसिंग गिरासे, संजय पाटील, गजानन कोठवदे, विशाल वाघ,लक्ष्मण जाधव, गौरव पाटील,महेश पाटील, चेतन पाटील, यश पवार, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील इंद्रजित पाटील, अभय वाघेरे, अतुल वाळुंजकर, अजित यादव, संदीप कांबळे, उमेश मुने , विशाल वाळुंज , अशोक कात्रिक, सागर तारू, अशोक पारधे, आशिष गवळी , आशुतोष काटे, विष्णू नायर, श्रीनाथ नानजकर, आकाश गवळी, शैलेश नायर , अजिंक्य पाटेकर, सौरभ नानकर, गुरु पिल्लाई, संजय जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
महापालिका निवडणुकीत युवकांना संधी – श्रीरंग बारणे
पिंपरी-चिंचवड शहरात युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे संघटन मजबूत झाले आहे. युवा सेनेचे काम अतिशय नियोजनबद्ध सुरू आहे. केंद्र, राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून दिला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी चांगले काम केले. त्यामुळे लोकसभेला मावळमध्ये महायुतीला यश मिळाले. तर, विधानसभा निवडणुकीत तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आता महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे. या निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. महापालिकेवरही महायुतीची सत्ता आणण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना केले.








