पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर येथे बनविण्यात येणऱ्या योगा पार्कच्या विकास कामाची पाहणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपाचे अति. आयुक्त प्रदिप जांभळे पाटील व अधिकरी यांच्या समवेत पाहणी केली.
नागरिकांसाठी विविध सोयीसुविधायुक्त असे योगा पार्क साकारण्यात येत आहे, यामध्ये १८ मीटर उंचीची बोल्डरिगं वॅाल, २१ मीटर स्पीड वॅाल, २१ मीटर लीड वॅाल, लहान मुलासाठी विविध खेळणी प्रकार, जेष्ठासाठी बैठक व्यवस्था, स्वतंत्र योगा व्यायामासाठी व्यवस्था, वॅाकीग ट्रॅक, प्रशस्त गार्डन व्यवस्था बनविण्यात आली आहे, या योगा पार्क मधे बनविण्यात आलेली क्लायबिगं वॅाल ही अशिया मधील सर्वात मोठी वॅाल आहे, या वॅाल मध्ये सराव करणारे मुले ही नॅशनल लेवल स्तरावर खेळतील अशी अपेक्षा नाना काटे यांनी यावेळी व्यक्त केली.

