ताज्या घडामोडीपिंपरीपुणे

दोन दिवसीय ई-आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दोन दिवसीय ई-आंतरराष्ट्रीय परिषद “थिन फिल्म डेपोझिशन, कॅरॅक्टरायझेशन आणि अप्लिकेशन्स”
(E-TDCA-2024) उत्साहाने ५ डिसें., रोजी सुरू झाली होती. भारत, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन,संयुक्त अरब अमिरात इ.विविध देशांमधून सुमारे १५०हून अधिक संशोधक उपस्थित होते. पैकी ७० सहभागी सादरीकरण स्पर्धेत होते, त्यापैकी १० स्पर्धकांना उत्कृष्ट म्हणून गौरविण्यात आले.

या वर्षीचा युवा संशोधकांसह महिला वैज्ञानिकांचे,सहसंयोजकांचे कौतुक करण्यात आले आणि विशेष पुरस्कार देण्यात आले.  प्रो. सी. डी. लोखंडे एंडोमेंट चॅरिटेबल ट्रस्टची फेलोशिप रु. ५०,०००/- श्री. संदेश गायकवाड, (निझरे,जावली- सातारा) पीएच.डी. विद्यार्थी, जो सध्या आपल्या पीएच.डी.साठी संशोधन करत आहे, यांना दिले गेले. प्रतिष्ठित आजीवन कार्य पुरस्कार डॉ. इम्तियाज एस. मुल्ला, ज्येष्ठ वैज्ञानिक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि एमेरिटस वैज्ञानिक (सीएसआयआर), पुणे यांना त्यांच्या थिन फिल्म्स, मटेरिअल सायन्स आणि नॅनोमटेरिअल्स मधील योगदानासाठी जाहीर करण्यात आले.तसेच प्रो.लोखंडे यांचा वाढदिवस प्रत्यक्षपणे डी.वाय.पाटील आरोग्य विद्यापीठ कसबा बावडा, कोल्हापूर येथे विद्यार्थी, सहकारी,हितचिंतक इ. सोबत साजरा झाला. त्यावेळेस सर्वांनी प्रो. लोखंडे यांना त्यांच्या आयुरआरोग्यासाठी शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केली. त्याला प्रतुत्तर देताना सरांनी सर्वांचे आणि प्रो. सी.डी. लोखंडे एन्डोमेंट चॅरीटेबल ट्रस्ट मधील सर्व सहकारी पदाधिकारी यांचे विषयीचे ऋण व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button