Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तृतीयपंथींच्या कल्याणाचा प्रश्न विधिमंडळात मांडल्याबद्दल आमदार अमित गोरखे यांचा  तृतीयपंथी समुदायातर्फे सत्कार केला. महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात आमदार अमित गोरखे यांनी  राज्यातील तृतीयपंथीयांचे कल्याण व त्यांच्या संरक्षण करण्याकरिता तृतीयपंथीयांचे कल्याण मंडळ यासाठी रूपये १० कोटी इतकी अतिरिक्त तरतूद करण्यात आली आपल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. सोबतच तृतीयपंथी-सामाजिक दृष्ट्या मागासलेला घटक  वंचितांच्या, शोषितांच्या व कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठविणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच समाजातील आणखीन एका घटकासाठी माणूस म्हणून उभे राहणे तो घटक म्हणजे तृतीयपंथी  म्हणूनच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड मनपाच्या धर्तीवर तृतीयपंथींना सुद्धा  राज्यभरात राज्य शासनासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये   नोकरीची संधी दिली पाहिजे,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “अनौपचारिकपणे साध्या अन् सोप्या शब्दांतून श्रोत्यांशी सहजसंवाद साधणे हाच यशस्वी निवेदनाचा मूलमंत्र होय!” असे मत ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी शाहीर योगेश रंगमंच, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे  व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त तसेच त्यांच्या निवेदन क्षेत्रातीलसुवर्णमहोत्सवानिमित्त कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवी या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्काराला उत्तर देताना गाडगीळ बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच सुप्रसिद्ध नर्तक आणि संस्कारभारती, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष पंडित डॉ. नंदकिशोर कपोते, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, कार्याध्यक्ष शिरीष पडवळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर पिंपरी – चिंचवड परिसरातील…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “माणसाचे वागणे कुटुंब घडवते, समाज घडवते आणि राष्ट्रदेखील घडवते. या जडणघडणीलाच संस्कार म्हणतात!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक विनोद इंगळे यांनी व्यक्त केले. लेवा पाटीदार मित्रमंडळ, सांगवी यांच्या वतीने डॉ. लीलाधर पाटील लिखित ‘संस्कार’ पुस्तकाचे प्रकाशन जुनी सांगवी येथील डॉल्फिन कार्यालयात संपन्न झाले. यानिमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विनोद इंगळे बोलत होते.      याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक नामदेव ढाके, शारदा सोनवणे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, एल सी सी आय ए (पी सी एम सी चाप्टरचे) अध्यक्ष भूषण गाजरे, समता भातृ मंडळाचे अध्यक्ष हेमंत झोपे,…

Read More

 मुख्य रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होऊन वाहतूक कोंडी होणार कमी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- त्रिवेणीनगर मार्गे भक्ती शक्ती चौकातून नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या ५५० मीटर लांबी असलेल्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून सध्या ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा उद्देश पुणे-नाशिक महामार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि निगडी भक्ती शक्ती चौक यादरम्यान वाहतूक दळणवळण सुधारणे आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे हा आहे. या प्रकल्पातील मंजूर आराखड्यातील २५०x७५ मीटर भूभागाच्या ताब्याचा प्रश्न मिटल्यानंतर जलद गतीने प्रकल्पाचे काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मंजूर विकास आराखडयानुसार हा रस्ता ७५ मीटर रुंदीचा असून सद्यस्थितीत ३७ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे काम…

Read More

पिंपरी चिंचवड शहरात रतन टाटा यांचे स्मारक उभारावे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  भारतीय उद्योग विश्वाचा पाया रचण्यात टाटा कुटुंबीयांचे अतुलनीय योगदान आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात टाटा मोटर्स सह टाटा कंपनीच्या इतर शाखांमुळे शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. या शहराच्या औद्योगिक पायाभरणीमध्ये उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे. कामाप्रति त्यांची निष्ठा आणि आपल्या कामगारांवर असणारे त्यांचे प्रेम यामुळे आज लाखो लोकांना रोजगार निर्माण झाला आहे. स्व. रतन टाटा यांचे उद्योग विश्वाविषयी असणारे कार्य घरोघरी पोहोचायला पाहिजे. यासाठी त्यांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातून “टीम पिंपरी चिंचवड”  च्या…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  भारतीय माजी सैनिक संघ, पुणे जिल्हा केंद्राची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, आकुर्डी, मुंबई पुणे महामार्ग खंडोबा मंदिर, सांस्कृतिक भवन येथे रविवारी (दि. २९ डिसेंबर) सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव डी. एच. कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.      यावेळी बँक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर कविता सिंग, झोनल ऑफिस, ब्रिगेडियर मधुकर प्रचंड (नि), आजीव अध्यक्ष,आयइएसएल, पीडीसी, ब्रिगेडियर डढीच (नि), व्हीएसएम कर्नल आर. ई. कुलकर्णी (नि), ले. कर्नल व्ही. व्ही. वेसविकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.    भारतीय माजी सैनिक संघ ही माजी सैनिकांसाठी कार्य करणारी देशातील…

Read More

नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे वयाच्या ९२व्या वर्षी गुरुवारी रात्री कालवश झाले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थऋषी गमावला आहे. मनमोहन सिंग यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील व सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले हाेते. उपचारादरम्यान रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. मनमोहन सिंग यांच्यामागे पत्नी गुरशरण कौर व तीन कन्या असा परिवार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी दोनदा देशाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात साजरे झाले. संगीत, कला, नृत्य तसेच प्रादेशिक लोकगीतांचा अविष्कार सादर करून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जोपासण्याचा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यावेळी दिला. रंगीबेरंगी पोशाखातील सहभागी उत्साही विद्यार्थी आणि पालक प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. अहवाल वाचनानंतर ‘एंडेव्हर’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.    पालक, प्रतिनिधी ॲड. प्रीती सिंग, शिवाजी पाटील, दिपाली दातार, निकू मोनी,  एसबीपीआयएमचे प्रा. डॉ. स्वप्नील सोनकांबळे, रेशू अग्रवाल, उपप्राचार्य पद्मावती बंडा,…

Read More

पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये दिनांक 24, 25 व 26 जानेवारी, 2024 रोजी मिलीटरी डेअरी फार्म ग्राउंड, पिंपरी पॉवर हाउस जवळ, शास्त्री नगर, पुणे 411017 (महाराष्ट्र) येथील विशाल मैदानांवर आयोजित केला जात आहे. परमात्म्याची ओळख करुन मानवी जीवन दिव्य गुणांनी युक्त करत अनंताकडे विस्तारित करुन विश्वामध्ये सौहार्द व शांतीसुखाचे वातावरण निर्माण करणे हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे. या भव्यदिव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छा सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार-प्रसार विभागाचे…

Read More

जनतेचा सरकारवरील विश्वास उडू देऊ नका पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात नाही. तक्रारदाराला मानसिक त्रास दिला जातो. वाकड, हिंजवडी, काळेवाडी आणि सांगवी या पोलीस ठाण्यासंदर्भातील सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देण्याची सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.  तसेच जनतेचा सरकारवरील विश्वास उडू देऊ नका असेही त्यांनी पोलिसांना सुनावले. कौटुंबिक, मारहाण, विनाकारण त्रास देत असल्याबद्दल पोलीस ठाण्यात गेल्यास सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून दाद दिली जात नाही. तत्काळ गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. तक्रारदाराला धमकावले जाते. त्याच्याशी…

Read More