ताज्या घडामोडीपिंपरी
भारतीय माजी सैनिक संस्थेची रविवारी आकुर्डीत वार्षिक सर्वसाधारण सभा


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय माजी सैनिक संघ, पुणे जिल्हा केंद्राची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, आकुर्डी, मुंबई पुणे महामार्ग खंडोबा मंदिर, सांस्कृतिक भवन येथे रविवारी (दि. २९ डिसेंबर) सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव डी. एच. कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
यावेळी बँक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर कविता सिंग, झोनल ऑफिस, ब्रिगेडियर मधुकर प्रचंड (नि), आजीव अध्यक्ष,आयइएसएल, पीडीसी, ब्रिगेडियर डढीच (नि), व्हीएसएम कर्नल आर. ई. कुलकर्णी (नि), ले. कर्नल व्ही. व्ही. वेसविकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारतीय माजी सैनिक संघ ही माजी सैनिकांसाठी कार्य करणारी देशातील सर्वात जुनी नोंदणीकृत राष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचे उद्घाटन १९६४ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तसेच जनरल थिमया व फिल्ड मार्शल करिअप्पा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे करण्यात आले होते. महाराष्ट्रातील कार्यालय मुंबई आझाद मैदान येथे कार्यरत असून पुणे जिल्ह्यातील कार्यालय १९७८ पासून निगडी प्राधिकरण, सेक्टर २८ येथे संत ज्ञानेश्वर उद्यान येथे सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून वृध्द माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा पत्नी, वीर माता-भगिनी तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीय त्यांची मुले त्याच्या अनेक विविध प्रश्नांचे विनामूल्य निराकारण करण्यात येते. या सभेस भारतीय भूतपूर्व सैनिक, सैनिक तसेच सामान्य नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








