Author: maharashtrabreakingnews.com

– सुमारे १५०० पालकांची एकत्र चाल : कुटुंब संस्कृती अन्‌ आरोग्याचा संदेश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्ञान प्रबोधिनीच्या पालक महासंघाने कुटुंब संस्कृती आणि कुटुंबाचे आरोग्य या विषयांसाठी ‘वॉकेथोन’चे आयोजन केले होते. स्वामी विवेकानंद जयंतीच्यानिमित्ताने पालकांनी एकत्र येऊन कुटुंब संस्कृतीचा आगळा वेगळा महोत्सव साजरा केला. वय वर्षे २ ते वय वर्षे ९० अशा सर्व वयोगटातील सदस्य यामध्ये सहभागी झाले होते. १ किमी, ३ किमी, ६ किमी अशा तीन गटात हे सदस्य सहभागी झाले होते. विद्यमान विधानपरिषद आमदार अमित गोरखे, एव्हरेस्ट वीर सागर पालकर, एव्हरेस्ट वीर शरद कुलकर्णी, उद्योजक प्रसाद कुलकर्णी, युवा नेते जयदीप खापरे यांनी या उपक्रमाचे उद्घाटन…

Read More

पीसीईटी, पीसीयू ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह’ नवकल्पना व आर्थिक विकासाला चालना देणारा उपक्रम पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला शेती व उद्योजकतेच्या माध्यमातून चालना देणे आवश्यक आहे. विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्रात तरुणांबरोबरच महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने, बालेवाडी येथे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ मध्ये उद्घाटनाच्या द्वितीय सत्रामध्ये चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते. “विद्यापीठे आणि व्यावसायिक संस्थांमध्ये भागीदारीद्वारे उद्योजकता, संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन…

Read More

रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कलाश्री संगीत महोत्सवाची सांगता पिंपरी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज ) – कलाश्री संगीत मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘कलाश्री पुरस्कार’ लोकनेते माजी आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ पंडित गिरीष संजगिरी यांना उद्योजक विजय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच स्व. शंकुतला नारायण ढोरे यांच्या स्मरणार्थ ‘कलाश्री युवा पुरस्कार’ प्रसिद्ध सतार वादक पं. मोहसीन खान यांना जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे २७ वा कलाश्री संगीत महोत्सव रसिकांच्या मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी उद्योजक विजय…

Read More

राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळेचे  १८ जानेवारीला आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळेचे भाविसा सभागृह, भावे हायस्कूलमागे, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ठीक ११:०० वाजता ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर अध्यक्षस्थान भूषवतील. ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे आणि सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. भोजनोत्तर दुसर्‍या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘दिल की नजर से…’ या खास नववर्षानिमित्त १९५० ते २००० या पाच दशकातील सुपरहिट व्हिज्युअल हिंदी – मराठी गीतांचा नजराणा असलेल्या नि:शुल्क सांगीतिक मैफलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब जवळकर, विलास गधाडे, सुहास कुलकर्णी, उत्तम जाधव, ॲड. स्मिता शेटे, उषा शेटे, विलास खरे, नीलेश मोरे, राजेंद्र लढ्ढा, संदीप राजेशिर्के, अनिल दळवी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सांगीतिक मैफलीत विनायक कदम, नंदकुमार कांबळे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून व‍िकास कामांची आखणी करत पीएमआरडीएच्या गृह प्रकल्पातील अडचणी तातडीने दूर करण्याचे न‍िर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. पीएमआरडीएअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पांसह भूखंडाची पाहणी करत त्यांनी सदन‍िकाधारकांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत पेठ क्रमांक १२ येथे गृहप्रकल्प फेस १ आणि फेस २ उभारण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांना महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी भेट देत नुकतीच कामाची पाहणी केली. यादरम्यान पूर्वीच्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांच्या अडचणी लक्षात घेत नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे महामंडळ स्थापन करण्यात आले वर्षानुवर्षे या महामंडळात मार्फत कमी जास्त प्रमाणात लाभ मिळत गेला आता सुमारे मात्र चार महिने झाले राज्य शासनाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे बंद करून ठेकेदाराला पोसण्यासाठी खाजगी सुविधा केंद्र सुरू केल्याने महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे प्रचंड नुकसान होत आहे असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, बांधकाम कामगार समिती तर्फे पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम कामगारांची बैठक आज संभाजीनगर चिंचवड येथे घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने,आयोजक तुषार घाटूळे,श्यामसुंदर खेडकर,दीपचंद वानखेडे, सुनील जाधव,…

Read More

पीसीईटी, पीसीयू, गर्जे मराठी ग्लोबल, एमईडीसीच्या परिषदेचे उद्घाटन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये मराठी उद्योजक मोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्रात नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. महाराष्ट्र बरोबरच देशभर उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराला चालना देण्यासाठी सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि उद्योजक यांच्यामध्ये योग्य समन्वय, संपर्क होणे आवश्यक आहे. त्यासाठी पीसीईटी, पीसीयू, गर्जे मराठी ग्लोबल आणि एमईडीसी यांनी स्थापन केलेले ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ हे व्यासपीठ मार्गदर्शक ठरेल. या व्यासपीठामुळे महाराष्ट्र सह जगभरातील मराठी उद्योजकतेला चालना मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज सोमवार दि. १३ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राजमाता जिजाऊ माँसाहेब या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शक आणि स्वराज्याच्या प्रेरणास्रोत होत्या शिवाय त्या स्वतः थोर पराक्रमी, युद्धनीती निपुणही होत्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजनीती, युध्दकलेची शिकवण देऊन त्यांच्या राज्यकारभारत तसेच विविध मोहिमांमध्ये महत्वपूर्ण मार्गदर्शनही केले तर स्वामी विवेकानंद हे थोर देशभक्त आणि आधुनिक भारतातील एक प्रभावशाली विचारवंत होते त्यांनी समाजातील तरुणांना आत्मसुधारणा आणि देशाच्या सामाजिक प्रगतीसाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याचे आवाहन करून प्रोत्साहन दिले असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.…

Read More