सरकारच्या निर्णयाने बांधकाम कामगारांचे नुकसान – काशिनाथ नखाते


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे महामंडळ स्थापन करण्यात आले वर्षानुवर्षे या महामंडळात मार्फत कमी जास्त प्रमाणात लाभ मिळत गेला आता सुमारे मात्र चार महिने झाले राज्य शासनाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे बंद करून ठेकेदाराला पोसण्यासाठी खाजगी सुविधा केंद्र सुरू केल्याने महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे प्रचंड नुकसान होत आहे असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.



कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, बांधकाम कामगार समिती तर्फे पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम कामगारांची बैठक आज संभाजीनगर चिंचवड येथे घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने,आयोजक तुषार घाटूळे,श्यामसुंदर खेडकर,दीपचंद वानखेडे, सुनील जाधव, ओमप्रकाश मोरया,रवींद्र जाधव,स्वाती घाडगे,नंदा बहिर,वैशाली भदाणे,अनिता श्रीराम जाधव,रूपा पोरे,निलोफर शेख,छाया पाटील,श्रीदेवी वाहुळे, शरिन सय्यद,मधू यादव महादेव गायकवाड आदी उपस्थित होते.
पुढे नखाते म्हणाले की राज्यातील बांधकाम कामगारांना साधे व सोपे होईल आणि जेथे शक्य होईल अशा ठिकाणी अर्ज नोंदणी करणे तसेच नूतनीकरण करणे अशी सुविधा यापूर्वी या ऑनलाइन पोर्टलद्वारे खुल्या पद्धतीने होती. मात्र ते आता बंद करून महाराष्ट्र राज्यातील ३५० पेक्षा अधिक ठिकाणी खाजगी कंपन्यांना काम देऊन खाजगी ठेकेदार पोसण्यासाठी त्यांना हे काम देण्यात आलेले आहे त्यांच्याकडून अर्ज प्रक्रिया होत नाहीत कामगारांना आपले काम बुडवून तासन तास ताटकळत राहावे लागत आहे हे चुकीचे असून त्यामुळे कामगारांना विविध मिळणाऱ्या योजना ह्या पूर्णतः सध्या बंद झाल्याचे चित्र आहे . राज्य शासनाकडून तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून एसटी बसेस, वेगवेगळ्या स्थानकात व वेगवेगळ्या ठिकाणी केवळ सरकार हे लाभ देत आहे म्हणून जाहिराती करण्यात येत आहेत.
त्या खऱ्या आहेत का ? लाभ मिळतो का? हा प्रश्न आता बांधकाम कामगारांना पडलेला आहे. त्यांना सुरक्षा साधने , शिष्यवृत्ती योजना, विवाह अनुदान, प्रसूती अनुदान,गृहप्रकल्प अनुदान, गंभीर आजार उपचार या सर्व योजना त्वरित सुरू केल्या तर ठीक अन्यथा लवकरच मुंबई येथे बांधकाम कामगारांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही नखाते यांनी आज दिला आहे .








