ताज्या घडामोडीपिंपरी

महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राजमाता जिजाऊ माँसाहेब या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शक आणि स्वराज्याच्या प्रेरणास्रोत होत्या शिवाय त्या स्वतः थोर पराक्रमी, युद्धनीती निपुणही होत्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजनीती, युध्दकलेची शिकवण देऊन त्यांच्या राज्यकारभारत तसेच विविध मोहिमांमध्ये महत्वपूर्ण मार्गदर्शनही केले तर स्वामी विवेकानंद हे थोर देशभक्त आणि आधुनिक भारतातील एक प्रभावशाली विचारवंत होते त्यांनी समाजातील तरुणांना आत्मसुधारणा आणि देशाच्या सामाजिक प्रगतीसाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याचे आवाहन करून प्रोत्साहन दिले असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य लिपिक स्वप्नील भालेराव, सामाजिक कार्यकर्ते सागर तापकीर, दत्ता माने, युवराज सुरवसे, सुभाष पिंगळे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button