- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
“टीम नॅशोर्न्स” ची अकरा पदकांची कमाई, भारतात प्रथम क्रमांक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या एसएई इंडिया एम-बाहा २०२५ या राष्ट्रीय स्पर्धेत रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) मधील मेकॅनिकल विभागातील “टीम नॅशोर्न्सने” एकूण अकरा पदकांची कमाई करत भारतात प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत देशभरातील पन्नासहून अधिक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या १७ व्या आवृत्तीत आयोजकांनी ट्रॅकमध्ये बदल केला होता आणि त्यात नवीन बिट समाविष्ट केले होते. टीम नॅशोर्न्सने ड्युरेबिलिटी, फिझीकल डायनॅमिक्स, स्टॅटिक इन्फॉर्मेशन, प्रोडक्शन कॉस्ट, मॅन्युव्हरेबिलिटी, डिझाइन, व्हॅलीडेशन अशा…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – NCC नॅशनल कॅडेट कॉर्प्सने भारतीय लष्कर दिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन केल्याने आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा परिसर देशभक्ती आणि अभिमानाने जिवंत झाला. भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि समर्पणाचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, NCC कॅडेट्स आणि आदरणीय पाहुण्यांचा उत्साही मेळावा दिसला. भारतीय लष्कर दिन, दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो, 1949 मध्ये फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी ब्रिटिश जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या रक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हा दिवस आहे. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या युद्ध स्मारकावर पुष्पहार…
सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोकाट फिरणारे श्वान प्राणी (मोकाट कुत्रे) यांचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा परिसरातील सर्व श्वान प्राणी आपल्या पशुवैद्यकीय कार्यालयात तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगावर सोडण्यात येतील, असा इशारा भाजप उपाध्यक्ष सांगवी रहाटणी मंडल ललित म्हसेकर यांनी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मोकाट फिरणारे श्वान प्राणी (मोकाट कुत्रे) यांचा लावकरात लवकर बंदोबस्त यावा अन्यथा परिसरातील सर्व श्वान प्राणी आपल्या पशुवैद्यकीय कार्यालयात तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगावर सोडण्यात येतील. गेले तीन ते चार आठवड्यापासुन परिसरातील ज्येष्ठ नागरीक, लहान मुले व इतर नागरीक जीव…
उपायुक्तांनी साधला ‘एमआयटी एडीटी’तील विद्यार्थ्यांशी संवाद लोणी काळभोर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विद्यार्थी व युवा हे आपल्या विकसित राष्ट्राच्या वाटचालीतील मुख्य भागिदार आहेत. इंजिनिअर, संशोधक म्हणून त्यांच्या खांद्यावर भविष्यात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहावे, भरपूर अभ्यास करावा आणि आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून कुठलीही समस्या आल्यास थेट कायदा हातात न घेता, प्रथम ११२ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा. कारण, पोलिस हे आपले शत्रु नव्हे मित्र आहेत, असे प्रतिपादन पुणे शहर झोन-५ चे पोलिस उपायुक्त डाॅ.राजकुमार शिंदे यांनी केले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी, पुणे शहर हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलिस…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पूर, भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात उद्भवणाऱ्या समस्यांचे सुयोग्य नियोजन तसेच समुदाय, सांस्कृतिक वारसा, सामाजिक व आर्थिक मालमत्ता यांचे संरक्षण करण्याबाबतचे प्रशिक्षण प्रात्याक्षिकांद्वारे आणि संगणकीय सादरीकरणाद्वारे पिंपरी चिंचवड महापालिका आपत्ती व अग्निशमन विभागातील अधिकारी कर्मचारी आणि जवानांना देण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी जपानमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी कार्यरत असलेल्या स्थानिक प्राधिकरण परिषदेच्या सिंगापूर येथील प्रतिनिधी कार्यालयाच्या सहकार्याने चिंचवड येथील विज्ञान केंद्र येथे अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या विविध सत्रात आपत्ती व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी औंध कॅम्पच्या ३३० इन्फट्री ब्रिगेडचे कर्नल नितीन रुमाले, पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य…
विभागीय समिती सदस्यपदी सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे व सीए राजेश अग्रवाल पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दी इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समिती सदस्यपदी (सेंट्रल कौन्सिल मेम्बर – सीसीएम) पुण्यातील सीए चंद्रशेखर चितळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. विभागीय समिती सदस्य (रिजनल कौन्सिल मेंबर-आरसीएम) म्हणून सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे व सीए राजेश अग्रवाल यांची प्रथमच निवड झाली आहे. यंदा पुणे शाखेतून एक सीसीएम आणि तीन आरसीएम निवडून आले आहेत. २६ व्या सेंट्रल कौन्सिलसाठी व २५ व्या रिजनल कौन्सिलसाठीची निवडणूक नुकतीच झाली. ही निवड २०२५-२०२९ या कालावधीसाठी असणार आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुणे…
‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ समारोप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) उद्योग जगतामध्ये यश मिळवण्यासाठी उद्योजकांनी परिवर्तनशील असावे, श्रमाला अर्थपूर्ण संधीमध्ये परावर्तित करून, सर्वोत्तम गुणवत्तेची कास धरून यशस्वी होता येते. खुल्या आर्थिक धोरणात या गिग इकॉनॉमीच्या काळात व्यवसायातील पारंपरिक पद्धती बाजूला ठेवून, विशेष कौशल्य प्राप्त असणाऱ्या अनेक व्यक्तींना एकत्रित करून, नाविन्यपूर्ण कल्पना राबवून आपल्या उत्पादनाचे, सेवेचे वेगळेपण खुल्या बाजारपेठेत सादर करून ग्राहकांना कमी खर्चात सेवा देता आली पाहिजे तोच व्यवसाय व उद्योजक यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन पर्सिस्टंट कंपनीचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड च्या गडगंज संपत्ती बाबत अनेक खुलासे समोर येत आहेत त्यातच आता उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात देखील वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतच्या ६व्या मजल्यावर ६०१ नंबर चा ३.१५ कोटीपेक्षा अधिक किमतीचा ४ बीएचके फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कराड ने या त्याचा फ्लॅट चा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मिळकत कर न भरल्यामुळे कर संकलन विभागाने त्याच्या या फ्लॅट वर नोटीस सुद्धा लावली आहे. पिंपरी-चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला जाणार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. वाकडमधील पार्क स्टेट येथे कोट्यावधीचा फ्लॅट असल्याचं उघड झालं आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर सहाव्या मजल्यावर ६०१ फ्लॅट नंबरचा हा फ्लॅट आहे. सुमारे एक लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे. कराडने थकबाकी न भरल्यास महानगरपालिका पुढे नेमकी काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिककराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली- मोरे वस्ती परिसरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी चिखलीतील युवा कार्यकर्ते यश साने यांनी आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका हदीतील चिखली- मोरेव्ती या भागात मुख्य रस्ते, सोसायट्यांमधील अंर्त रस्ते,ड्रेज लाईन आदी कामे अनेकदिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे. या मध्ये अंगणवाडी रस्त्याची स्ट्रॉम ‘वॉटर लाईनचे काम खोळंबले आहे.ते त्वरीत पू्ण करावे व्याचबरोबर परिसरातील बहुतांश सोसायट्यंमधील रस्यांची दुरस्था झाली आहे. या ठिकाणी रस्ते दुरसती करणे गरजेचे आहे. तसेच काही सोसायट्ांमधीलड्रेज लाईन जु्या झालेल्या आहेत. त्या बदलून नवीन ड्रेज…
