वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; कोट्यवधींचा फ्लॅट असल्याचं उघड, महानगरपालिकेने बजावली नोटीस


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. वाकडमधील पार्क स्टेट येथे कोट्यावधीचा फ्लॅट असल्याचं उघड झालं आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर सहाव्या मजल्यावर ६०१ फ्लॅट नंबरचा हा फ्लॅट आहे. सुमारे एक लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे. कराडने थकबाकी न भरल्यास महानगरपालिका पुढे नेमकी काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिककराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर परळीत मात्र आंदोलन सुरू झाले असून कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

वाल्मिक कराडचा पिंपरीत आणखी एक फ्लॅट
वाल्मिक कराडचा आलिशान फ्लॅट सील करण्याची प्रक्रिया पिंपरी चिंचवड पालिकडेकडून सुरु आहे. असं असतानाचं वाल्मिक कराडचा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आलंय. हा फ्लॅट पत्नी मंजली वाल्मिक कराड यांच्या नावावर आहे. पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील ४०३ नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे. १ एप्रिल २०१६ पासून हा फ्लॅट मंजली यांच्या नावे असल्याची नोंद पिंपरी पालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. आजच्या बाजारभावानुसार हा फ्लॅट एक कोटींचा आहे.








