Author: maharashtrabreakingnews.com

‘पर्पल जल्लोष २०२५’ चा समारोप उत्साहात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवनाच्या वतीने १७ ते १९ जानेवारी या कालावधीत  ‘पर्पल…

Read More

सावंतवाडीतील सुसज्ज “भोसले नॉलेज सिटी” हे संमेलन स्थळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण-राजा माने मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,कोकण विभागाचे अध्यक्ष सागर चव्हाण,प.महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, सचिव महेश कुगावकर,सहसचिव केतन महामुनी,राज्य संघटक शामल खैरनार,राज्य सहसंघटक तेजस राऊत,राज्य समन्वयक इक्बाल शेख,राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे व अमोल पाटील यांची सावंतवाडी येथील ख्यातनाम संस्था ” भोसले नॉलेज…

Read More

थेरगाव (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – थेरगाव येथे स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कार्यक्रमात राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कारप्राप्त श्री सिध्दनाथ घायवट जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आजची युवा पिढी ही आपल्या थोर महापुरुषांच्या तथा आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या जयंती वा पुण्यतिथी साजरी करत असते. या साजरीकरणात प्रतिमापूजन, हरिद्राकुंकुम् समर्पण,पुष्पहार अर्पण किंवा मग मिरवणूक वा जलसा वगैरे आयोजिले जाते आणि त्याद्वारे महापुरुषांचे पूजन केले जाते; परंतु या सर्व खटाटोपांशिवाय महापुरुषांचे विचार तथा आदर्श मार्गदर्शन हे आपल्या स्वतःमध्ये बिंबवून तथा आत्मसात करून तद्मार्गाने मार्गक्रमण करीत राहणे याच्यातूनच थोर महापुरुषांचे पूजन हे खर्या अर्थाने साध्य होत राहील असे वक्तव्य श्री…

Read More

– इंद्रायणी नदी संवर्धन जागृतीसाठी 35 हजार सायकलपटूंची रॅली – भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा विश्वविक्रमी उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-2025’’निमित्ताने भोसरीमध्ये पर्यावरण प्रेमींचा अक्षरशः कुंभमेळा भरला. सुमारे 35 हजार पर्यावरण प्रेमी, नागरिक, सायकलस्वार या रॅलीमध्ये सहभागी झाले. भोसरी येथील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर विश्वविक्रमी सायकल फेरी उत्साहात आणि निर्विघ्नपणे संपन्न झाली. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, शिवांजली सखी मंच, सारथी हेल्पलाईन यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्पल जल्लोष – दिव्यागांचा महाउत्सव’ कार्यक्रमाचा समारोप समारंभ १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या समारोप समारंभास महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित राहणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या विशेष उपस्थितीत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्राच्या प्रांगणात होणाऱ्या या समारंभास राज्याचे उच्च व तंत्रशित्रण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  थिरकणाऱ्या व्हीलचेअर्स… रसिकांच्या टाळ्यांचा निनाद… दिव्यांग कलाकारांकडून सादर करण्यात आलेला अद्भूत अविष्कार…. भरतनाट्य, कथ्थक नृत्याची जुगलबंदी…. सुफी नृत्य… मार्शल आर्ट… यांचा सुरेख मिलाफ असणारे विलोभनीय  नृत्य…. हे पाहताना उपस्थितांच्या अंगावर उमटलेले  शहारे आणि नकळत आलेले डोळ्यांत पाणी… या सर्वांचा अद्भूत संगम असलेला अविश्वसनीय असा ‘मिरॅकल ऑन व्हील्स’ या रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्यांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत  चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे ‘पर्पल जल्‍लोष’ हा महोत्सव आयोजित…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. धनंजय मुंडे यांना यादीतून वगळले आहे. मुंंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न देता त्यांचा जिल्हा असलेल्या बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि मुंबई शहर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडबरोबरच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. गडचिरोली, मुंबई उपनगर आणि…

Read More

पीसीसीओईआरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला (पीसीसीओईआर) पुढील दहा वर्षांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाची (युजीसी) शैक्षणिक स्वायत्तता मिळाली असून पीसीसीओईआर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.      पीसीसीओईआर तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण, उत्कृष्ट निकाल व संशोधनातील विक्रमांमुळे प्रसिद्ध आहे. महाविद्यालयाची आजवरची निकालाची परंपरा, महाविद्यालयाने मिळवलेले एनबीएचे मानांकन तसेच नॅकचे “ए प्लस प्लस” मानांकन, विद्यार्थ्यांच्या सर्वंकष प्रगतीसाठी केलेले विविधांगी प्रयत्न अशा अनेक कठोर निकषांवर ही स्वायत्तता पीसीसीओईआरला देण्यात आली आहे. या स्वायत्ततेनुसार पीसीसीओईआरला तंत्रज्ञान व व्यावसायिकता यावर आधारित…

Read More

कोकणवासिय मित्र परिवारांच्या सत्कार पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि कोकणाचा विकास झाला नाही हे वास्तव आहे. कोकणाचा विकासाचा आणि सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन गृह आणि महसूल ग्रामीण विकास पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी व्यक्त केले.     पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधील कोकण वासिय मित्र परिवारांच्या वतीने पिंपरी येथे आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे माजी सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्ष सद्गुरु कदम, शशिकांत चव्हाण, आण्णा कदम, राजेश दळवी, अवधूत कदम, गजानन मोरे, माजी नगरसेवक…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथे नुकत्याच झालेल्या ‘ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना लिव्हींग लिजंड ऑनर ने सन्मानाने गौरवण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व परिषदेचे मुख्य संयोजक सचिन ईटकर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची प्रमुख…

Read More