Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ रोजी ५० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन@५० शहर धोरण हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध विषय आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांवर महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मते, सल्ले, उपाययोजना जाणून घेण्यासाठी आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये गटचर्चेचे (फोकस ग्रुप डिस्कशन) आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप आयुक्त विठ्ठल जोशी, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अमित पंडीत तसेच विविध विभागांचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, आरोग्याधिकारी, कर्मचारी तसेच शहर परिवर्तन कार्यालयाचे सल्लागार उपस्थित होते. व्हिजन@५० शहर धोरण उपक्रमाअंतर्गत येत्या ७ वर्षात महापालिका सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपरी…

Read More

भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा, सामूहिक अग्निहोत्र पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  अग्निहोत्र ही मूळ वैदिक उपासना आहे. आपला शिष्य सामर्थ्यवान बनला पाहिजे. यासाठी गुरु नेहमीच प्रयत्न करत असतात. शिष्याची समृद्धी, कल्याण, चेहऱ्यावरील हास्य, आनंद हीच गुरूला मिळालेली गुरुदक्षिणा असते. प्रत्येक शिष्य आनंदी राहावा हीच स्वामींची इच्छा असते. म्हणून स्वामी सांगतात जीवनात गर्व कधीही बाळगू नये. समर्पित भावनेने केलेली साधना तुम्हाला जीवनातील अत्युच्च आनंदाची प्राप्ती देते असे मार्गदर्शन अक्कलकोट येथील गुरुमंदिर व विश्व फाउंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी केले.    भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे…

Read More

– सोसायटी फेडरेशनच्या ‘महासंमेलन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – माझ्या संघर्षाच्या काळात सोसायटीधारक नागरिकांनी मला साथ दिली. त्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी कायम प्राधान्य देण्यात येईल. रक्ताची नाती नसतानाही ही आपुलकीचे नाते तयार झाले. विधानसभा निवडणुकीत सोसायटीधारकांच्या मदतीमुळेच मी विजयाची ‘हॅट्रिक’ करु शकलो. याबाबत सोसायटीधारकांसोबत कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या. चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून शहरातील सोसायटीधारकांसाठी ‘‘महासंमेलन-2025’’ आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार लांडगे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येत सोसायटीधारक उपस्थित होते. विशेष म्हणजे,…

Read More

इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी विश्वविजेत्या खो-खो टीमची कर्णधार प्रियंका इंगळेचे सर्वत्र कौतुक तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थेची माजी विद्यार्थिनी व भारतीय खो – खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वात भारतीय खो खो संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात प्रियंकाच्या नेतृत्वात भारतीय महिला खो-खो संघाने नेपाळ संघाचा 38 गुणांच्या फरकाने पराभव केला. तिच्या नेतृत्वातील भारतीय खो खो संघाच्या यशाबद्दल इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे आधारस्तंभ मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही मकर संक्राती निमित्त हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपळे सौदागर , रहाटणी परिसरातील विविध महिला मंडळे आणि ग्रामस्थ महिलांनी या हळदी कुंकू समारंभाला आवर्जून उपस्थित लावली. सुमारे १५०० महिलांनी उन्नतीच्या हळदी कुंकवाचा लाभ घेतला. पर्यावरण पूर्वक आणि औषधी गुणधर्म असलेल्या आणि भगवान पांडुरंगला परमप्रिय असलेली तुलसी रोपे हळदी कुंकुवाला वाण म्हणून देण्यात आली. यानिमित्ताने , महिलांसाठी उखाणे स्पर्धा आणि विविध मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते. या हळदी कुंकू समारंभास संस्थापक संजय तात्याबा भिसे , उन्नती सखी मंचच्या महिला सभासद , विठाई वाचनालयच्या…

Read More

खाद्य संस्कृती व पाक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- महाराष्ट्र राज्य इंस्टीटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेमध्ये अंतिम वर्ष पदवीतील हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या विद्याशाखेतील विदयार्थ्यांनी स्टार्टअप व ईडी सेल अंतर्गत “एलिसियम” अ मेडिटेरेनियन जर्नी या वार्षिक फुड फेस्टीवलचे यशस्वी आयोजन नुकतेच करण्यात आले होते. खावयानी विविध खाद्य प्रकारचा मनमुराद आस्वाद घेतला. खाद्य संस्कृती व पाक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले होते. या फुड फेस्टीवला संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक, डीटीई मुंबई डॉ. विनोद मोहितकर, उपाध्यक्ष व सहसंचालक, रिजनल ऑफीस, डीटीई पुणे डॉ. डि. व्ही. जाधव…

Read More

करदात्या नागरिकांच्या कररूपी पैशांवर प्रशासनाचा डल्ला.. शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांची तीव्र नाराजी… निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘अ’ क्षेत्रीय हद्दीतील प्राधिकरण आणि बिजलीनगर परिसरात मुख्य मार्गाच्या कडेला असणारा सुस्थितीतील पदपथ उखडून काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुस्थितीतील दगडी काढून सिमेंटचे नव्याने ‘पेव्हर ब्लॉक’ पुन्हा बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे करदात्या नागरिकांचा कररूपी पैसा वाया जात आहे. रस्त्याच्या डिव्हायडरवर अनेक भटकी कुत्री विष्ठा करून जातात. त्यांच्याकरिता या अनावश्यक कामास प्राधान्य दिले जात आहे का? असा सवाल शिवसेना चिंचवड विधानसभेचे ठाकरे पक्षाचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ‘प्रशासक राजवटीत विकासकामांच्या गोंडस नावाखाली…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कायम निःस्वार्थी सेवा उपक्रम राबविले जातात.त्यातीलच एक उपक्रम म्हणजे अनेक दिवसानपासून शहरातील व शहराबाहेरील गरजू मुल- मुलींना नवीन व जुन्या दुरुस्त करून मोफत सायकल देणे हा उपक्रम आविरत सुरु आहे यांचा अनेक गरजुना फायदा झाला आहे.या उपक्रमास शहरातील अनेक दानशूर मदत करीत असतात. चिंचवड गाव लिंक रोड वरील प्रशस्थ सोसायटी म्हणून मेट्रो पोलिटियन या सोसायटीने जेष्ठ नागरिक सेक्रेटरी खुशाल दुसाने यांच्या पुढाकाराने वूई टुगेदर फाउंडेशनच्या या उपक्रमास 15 सायकली प्रदान करून निःस्वार्थी सेवेचा मोठा वाटा घेतला आहे सदर कार्यक्रमाला या सोसायटीचे एफ विंग अध्यक्ष विठ्ठल भोईर,यांनी आपले मनोगत व्यक्त…

Read More

विकासाचा मुद्दा राहतो दूर : नेत्यांना खूष करण्याचाच प्रयत्न युवा संवाद आयोजित आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवास रोहित पवार यांची भेट पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पत्रकाराच्या लेखणीप्रमाणे व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात ताकद आहे. यामुळेच राजकारणी व्यंगचित्र प्रदर्शनास भेट देण्याचे टाळतात, असे वाटते. राजकीय, सामाजिक प्रश्नांवरील व्यंगचित्रांचा संदर्भ देऊन मार्मिक टिप्पणी करताना आमदार रोहित पवार म्हणाले, चित्रात दर्शविल्याप्रमाणे पाणी वाया घालवून महिला मात्र नळकोंड्यावर भांडणे करीत आहेत त्याप्रमाणे सभागृहात आम्ही राजकारणी मंडळी विकासाचा मुद्दा बाजूला सारून विरोधासाठी विरोध करताना किंवा नेत्याला खूष करण्याकरिता एकमेकांशी भांडत राहतो. युवा संवाद सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले असून  या महोत्सवास आज (दि. 19)…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “दृढनिश्चयाने केलेले काम म्हणजे संकल्प होय. त्यासाठी एक जानेवारी अथवा गुढीपाडवा अशा मुहूर्तांची गरज नसते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे (शनिवार, दिनांक १८ जानेवारी)  व्यक्त केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न!’ या प्रवचनमालिकेंतर्गत ६४वे प्रवचनपुष्प गुंफताना ‘संकल्पाला नवीन वर्षच का?’ या विषयावर डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. माजी नगरसेवक मधू जोशी, किरण येवलेकर, सुदाम शिंदे, गीतल गोलांडे, ॲड. अंतरा देशपांडे, सुप्रिया सोळांकुरे आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, “‘संकल्प’ या शब्दातील ‘सं’…

Read More