वूई टुगेदर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम: शहरातील गरजू मुलामुलींसाठी सायकली प्रदान


चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कायम निःस्वार्थी सेवा उपक्रम राबविले जातात.त्यातीलच एक उपक्रम म्हणजे अनेक दिवसानपासून शहरातील व शहराबाहेरील गरजू मुल- मुलींना नवीन व जुन्या दुरुस्त करून मोफत सायकल देणे हा उपक्रम आविरत सुरु आहे यांचा अनेक गरजुना फायदा झाला आहे.या उपक्रमास शहरातील अनेक दानशूर मदत करीत असतात.



चिंचवड गाव लिंक रोड वरील प्रशस्थ सोसायटी म्हणून मेट्रो पोलिटियन या सोसायटीने जेष्ठ नागरिक सेक्रेटरी खुशाल दुसाने यांच्या पुढाकाराने वूई टुगेदर फाउंडेशनच्या या उपक्रमास 15 सायकली प्रदान करून निःस्वार्थी सेवेचा मोठा वाटा घेतला आहे
सदर कार्यक्रमाला या सोसायटीचे एफ विंग अध्यक्ष विठ्ठल भोईर,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारे निःस्वार्थी उपक्रम व निःस्वार्थी सेवा या बद्दल सदर सोसायटीतील मान्यवर व सदस्यांना माहिती दिली व त्यांनी या सायकल उपक्रमास निःस्वार्थी मनाने मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. संस्थेचे कार्यकारिणीचे सदस्य उल्हास दाते व श्रीनिवास जोशी यांनी थोडक्यात संस्थेविषयी संपूर्ण माहिती तेथील सदस्यांना दिली.
आपल्या संस्थेचे कार्य ऐकून तेथील उपस्थित जेष्ठ सदस्य अशोक नहार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेला स्वइच्छेने देणगी दिली.
तसेच तेथील एफ बिल्डिंग मधील सोसायटीचे आध्यक्ष व महानगरपालिकेचे माजी स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करताना या पुढील काळात जी काही शक्य असेल ती मदत मी पुढील महिन्यात 20 एप्रिल ला माझा वाढदिवस आहे त्यानिमित्त मी श्यक्य तेवढी मदत करणार असे सांगितले.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक व रोटरी क्लब सदस्य शंकर गावडे यांनी त्यांच्या रोटरी क्लब तर्फे जर संस्थेकडे एखादा प्रोजेक्ट असेल तर तो पूर्ण करण्यासाठी रोटरी क्लब कडे पाठपुरा करेन व त्याव्यतिरिक्त श्यक्य ती मदत करेन असे आश्वासन दिले.
याप्रसंगी तेथील सेक्रेटरी मुळे,खजिनदार सुदीप राळेगणकर,जेष्ठ अध्यक्ष,वाळके,जेष्ठ नागरिक सेक्रेटरी खुशाल दुसाने,सदस्य रविन्द्र शेटे यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला वूई टुगेदर अध्यक्ष मधुकर बच्चे, सचिव मंगला डोळे – सपकाळे,सचिव जयंत कुलकर्णी, सलीम सय्यद, दारासिंग मन्हास, बाळासाहेब जगताप, अर्जुन गावडे, विजय केसकर, उल्हास दाते, श्रीनिवास जोशी आदी पदाधिकारी व माधवराव निमगुळकर , श्री घाटगे, श्री वागदरीकर, श्री गरड, भागवत काका, नहार अशोक, श्री जैन मधुकर नांगरे आदी सोसायटी सदस्य उपस्थित होते.








