Author: maharashtrabreakingnews.com

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजपा महाराष्ट्र सदस्य नोंदणी अभियान २०२५ चा शुभारंभ आमदार श्री पै महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली आज कुदळवाडी चिखली येथे केला. दिनेश यादव यांच्या हस्ते पहिला सदस्य नोंदणी करून अभियानाला प्रारंभ करण्यात आला. आपण सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजपा हा आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून अभिमानाने उभा आहे. आपल्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवावरच देश विकासाच्या मार्गावर अत्यंत वेगाने पुढे जात असून हा राष्ट्रप्रेम व विकासाचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान प्रत्येकाने यशस्वी करावे व जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी जोडावे, असे आवाहन  केले. यावेळी सर्व पदाधिकारी, नागरिक आदी  उपस्थित होते.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रीय बालिकादिनाचे औचित्य साधून इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी आणि ब्रह्माकुमारी शिवशक्ती लीडरशिप ॲप्रोच (एस एस एल ए) इंडिया रिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बीईंग दी बेस्ट व्हर्जन ऑफ यू’ ही महिला व्यक्तिमत्त्व विकास नि:शुल्क कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. रोटरी कम्युनिटी सेंटर, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत भारत आणि नेपाळ स्तरावरील राजयोग मार्गदर्शिका ब्रह्माकुमारी डॉ. सुनीतादीदी, विभागप्रमुख ब्रह्माकुमारी प्रवीणादीदी, ब्रह्माकुमारी सुलभादीदी, ब्रह्माकुमारी सुधादीदी यांच्या मार्गदर्शनाचा सहभागी महिलांना लाभ मिळाला. वय वर्षे अठरा आणि त्या पुढील सुमारे ८० महिलांनी यासाठी सहभाग घेतला होता. इनर व्हील क्लब…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित क्रांतिवीर चापेकर माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक विभागांमध्ये (शनिवार, दिनांक २५ जानेवारी) राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मतदान करण्याविषयी जनजागृती म्हणून सर्व विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. शुभांगी बडवे यांनी मतदान का करावे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या प्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने, माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा जाधव, खिवंसरा पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नटराज जगताप, सहशिक्षक बिभीषण चांडे, राजश्री पाटील, सुलभा झेंडे, शुभांगी बडवे, दीपाली शिंदे, सुलभा लोंढे, वैशाली कयापाक, तुषार बाहेकर, जगन्नाथ ढगे, सरला…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयातर्फे दिनांक २५/०१/२०२५ रोजी निवडणूक साक्षरता क्लब कडून राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त “नागरिकांचा मतदानाचा हक्क” या विषयावर  विक्रांत शेळके (सहाय्यक प्राध्यापक,प्रा.रामकृष्ण मोरे कॉलेज, आकुर्डी ) यांच्या गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री. शेळके यांनी विद्यार्थ्यांना मतदानाची गरज सांगून, मतदान प्रक्रियेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला, तसेच मतदान करण्याचे परिणाम हे उदाहरणासह सांगितले. यावेळी निवडणूक साक्षरता क्लबचे शिक्षक समन्वयक प्रा. प्रणव मुळे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व सांगून, मतदान वाढीसाठीच्या उपाययोजना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.…

Read More

वडगाव मावळ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वडगाव शहरातील सर्व प्रभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आमदार सुनील शेळके यांनी अवैधरित्या सुरु असलेल्या मटका आणि दारूच्या अड्डयावरही बेधडक छापा टाकून पोलिसांमार्फत कारवाई केली. आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून वडगाव शहरातील विशाल लॉन्स, मोरया कॉलनी, साई श्रुष्टी, पंचमुखी चौक, केशवनगर, मोरया चौक, बाजार पेठ, आंबेडकर कॉलनी, माळीनगर, दिग्विजय कॉलनी, संस्कृती सोसायटी, टेल्को कॉलनी, इंद्रायणीनगर, मिलिंदनगर, कातवी गाव या भागात प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांच्या आढाव्यासह नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तसेच इतर प्रश्नांबाबत प्रशासनास सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी माजी उपसभापती गणेशअप्पा ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कामगार नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचे नाव आता शिक्षण क्षेत्रात देखील पुढे येत आहे. यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ व डी. वाय. पाटील विद्यापीठ यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसेच मागील पंधरा वर्षांपासून डिझाईन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्हीनस आर्ट फाउंडेशनचा देखील गौरवाणे उल्लेख करावा लागेल असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.    व्हिनस आर्ट फाउंडेशनच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ, दिशा सोशल फाउंडेशन यांच्या सहयोगाने “पीसीएमसी डिझाईन एज्युकेशन फेअर २०२५” चे उद्घाटन चिंचवड ऑटो क्लस्टर येथे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण समारंभ संपन्न  होणार आहे. तरी नागरिकांनी या समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले  आहे. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात होणाऱ्या या मुख्य राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमाच्या प्रारंभी, सकाळी ७.५० वाजता भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (सरनामा) सामुहिक वाचन करण्यात येणार असून त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम नियोजित वेळेत संपन्न होईल. या समारंभास शहरातील लोकप्रतिनिधी, माजी नगरसदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय हा सोहळा नागरिकांना घरबसल्या देखील पाहता येणार असून…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ” लोकसाहित्य हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा गाभा असून, जुनी शिल्पं, शिलालेख, लोकगीते जतन करणे काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघ धनकवडी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी लोकाकलेतून लोकशिक्षण या विषयावर श्री यादव बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाजीराव गायकवाड, कवी जगदीप वनाशिव, सोमनाथ नाईक, भालचंद्र निखळ, बबन मांढरे, रामचंद्र चव्हाण, शकुंतला झगडे, सुनिता वाघमारे, प्रमोद पाटील श्री अकोलकर, श्री मधुकर नवले, आदी उपस्थित होते. श्री यादव म्हणाले, ” पूर्वीच्या काळी…

Read More

एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन लॉ कॉलेज समोरील जागा उपलब्ध पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी ५० वर्षाच्या वाहतुकीचा विचार करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पुणे विद्यापीठ चौकामध्ये मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन लॉ कॉलेजच्या समोरील रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा उपलब्ध नव्हती. या उड्डाणपुलाचे बांधकामासाठी प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने पुणे मनपाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार लॉ कॉलेज समोरील (मौजे औंध सर्वे नंबर ८५/८६ (सिटीएस नं. १४४८) मधील रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा पीएमआरडीएच्या पुढाकाराने उपलब्ध करुन द‍िल्याने रहदारीचा मार्ग मोकळा होणार असून संबंध‍ित जागेची ताबा पावती आज दि. २४ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली.…

Read More

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नवी सांगवी येथील संस्कृती मंगल कार्यालयात सकाळी महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्यात ३५० नागरिकांनी वेगवेगळ्या आजारांवर ट्रिटमेंट घेतली. रुग्णांना पुढे वेगवेगळ्या आजारांच्या बाबतीत डी वाय पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मोलाचे सहकार्य केले त्यातून वेगवेगळ्या 120 रुग्णांना पुढे वेगवेगळ्या समस्या उद्भवल्या आहेत त्यावर लक्ष फाऊंडेशच्या माध्यमातून वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये ‘फ्री उपचार केले जाणार आहेत.त्या बरोबर रक्तदान शिबिराचेही आयोजन केले होते.. त्या अनेक रक्त दात्यानी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन उद्योजक  विजय  जगताप यांच्या हस्ते झाले त्यांच्याबरोबर लक्ष फाउंडेशन चे रोशन मराठे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, शशिकांत अप्पा कदम, राजेंद्र जगताप, शारदा सोनवणे, गणेश…

Read More