खान्देश मित्र मंडळाचा १५ वा वर्धापनदिन आणि ‘महाआरोग्य शिबिर ‘उत्साहात संपन्न


नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नवी सांगवी येथील संस्कृती मंगल कार्यालयात सकाळी महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्यात ३५० नागरिकांनी वेगवेगळ्या आजारांवर ट्रिटमेंट घेतली.



रुग्णांना पुढे वेगवेगळ्या आजारांच्या बाबतीत डी वाय पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मोलाचे सहकार्य केले त्यातून वेगवेगळ्या 120 रुग्णांना पुढे वेगवेगळ्या समस्या उद्भवल्या आहेत त्यावर लक्ष फाऊंडेशच्या माध्यमातून वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये ‘फ्री उपचार केले जाणार आहेत.त्या बरोबर रक्तदान शिबिराचेही आयोजन केले होते.. त्या अनेक रक्त दात्यानी रक्तदान केले.

या शिबिराचे उद्घाटन उद्योजक विजय जगताप यांच्या हस्ते झाले त्यांच्याबरोबर लक्ष फाउंडेशन चे रोशन मराठे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, शशिकांत अप्पा कदम, राजेंद्र जगताप, शारदा सोनवणे, गणेश बँकेचे संचालक संजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर, रमेश काशीद, अतुल काशीद बाळासाहेब देवकर, राजेंद्र आरुडे आदी उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात संध्याकाळी कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे उद्घाटन प्रा. डॉ. सुरेश गोसावी व माजी कृषी संचालक श्री युवराज साळुंखे साहेब यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे आणि सत्कारमूर्ती आमदार शंकर भाऊ जगताप माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे,हर्षल ढोरे, सागर अंघोळकर, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, सामाजिक कार्यकर्त्या उज्वला ढोरे, कावेरी संजय जगताप, महेश भागवत, खानदेश मराठा पाटील संघाचे शरद पाटील, महेंद्र पाटील प्रदीप शिरसाठ तसेच खान्देश युवा महासंघाचे श्री उमेश पाटील, हिरालाल पाटील, एकनाथ सोनवणे,जयवंत पाटील,नितीन पाटील, महेंद्र गिरासे, देसले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्रा. उमेश बोरसे यांनी केले त्यांनी पंधरा वर्षातील केलेल्या मंडळाच्या कामकाजाविषयी माहिती दिली आणि भविष्याच्या योजनान बद्दल सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी मी कधीही गावाचे नाते तोडले नाही, आपण खानदेशी माणसं प्रचंड मेहनती असतो व मी आज मेहनतीच्या आणि ज्ञानाच्या बळावर भारतातील नामांकित अशा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कुलगुरू झालो मंडळाच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आणि मंडळाला काही गरज लागल्यास मी सदैव मदतीस तयार आहे असे आश्वासन दिले..
नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज साळुंखे यांनी देखील मंडळाच्या कार्याचे कौतुक केले आणि सर्वांनी मंडळाचे अध्यक्ष उमेश बोरसे यांच्या पाठीमागे उभे राहावे.आणि त्यांचे हात बळकट करावेत तसेच महिला, तरुण, विद्यार्थी यांनी खानदेशाचे नाव लौकिक करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमात माननीय प्रशांत शितोळे, शारदा सोनवणे, महेश भागवत, महेंद्र पाटील प्रा. वंदना पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डिंपल बोरसे, जानवी सोनवणे,गौरी माळी, परी माळी,यांनी सुंदर नृत्य सादर केले त्या सोबत दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी गुलाबपुष्प आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. अनेक ज्येष्ठ दांपत्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
महिलांसाठी खास मलाबार गोल्ड अँड डायमंड तर्फे पाच महिलांना लकी ड्रॉ द्वारे बक्षीस दिले आणि मंडळातर्फे सर्व महिलांसाठी हळदी कुंकवाचे वान देण्यात आले.
या कार्यक्रमात नितीन कदम प्रस्तुत सुमधुर फ्युजन ऑर्केस्ट्रा द्वारे अनेक हिंदी आणि खान्देशी गाण्यांवर महिला आणि पुरुषांनी ताल धरला..आणि कार्यक्रमाची रंगत वाढवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील आणि मनोहर पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष अरुण अहिरराव,खजिनदार भटू पाटील देविदास अहिरराव, नितीन पाटील, जगदीश सोनवणे, अरुण पाटील, लोटन बोरसे, राजू वानखेडे, गोपाल पाटील,शारदसिंह परदेशी कवीश्वर पाटील, मनोहर पाटील, मिलिंद पाटील, गिरासे, तुकाराम पाटील, प्रमोद पाटील, महेंद्र साळुंखे, ॲड.वरदे,रवींद्र माळी,शांताराम पाटील, दिनेश चव्हाण प्रफुल पाटील आदींनी परिश्रम घेतले.








