- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते मित्र परिवाराच्या वतीने स्वतंत्र भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित् ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्ताने रहाटणी गाव ते प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या सायकल वारी करणाऱ्या अयोध्या वीर रहाटणी गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर तांबे, संतोष नखाते,श्रीकांत काटे, अमित नखाते, वैभव तांबे व संदीप गायकवाड यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच प्रजासत्ताक दिना निमित्त योग गुरु श्री सुरेश जी विटकर व शिवसेना विभाग संघटिका सौ सुजाता ताई हरेश आबा नखाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी केले. तसेच आभार एकनाथ मंजाळ…
पीएमआरडीएच्या माध्यमातून पीडीआरएफची स्थापना पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जिल्ह्यातील भुशी डॅम दुर्घटना, पुणे शहरातील पूरपरिस्थिती आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा हवी. या संकटांमध्ये त्वरित मदतीसह बचाव कार्य सुनिश्चित करण्यासाठी पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) स्थापन करण्यात आले असून पथकाच्या वाहनांचे लोकार्पण मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तृत कार्यक्षेत्रातील डोंगराळ भाग, जुन्या इमारती, धरणे, तलाव आणि महामार्गांवरील दुर्घटनांच्या संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) जलद प्रतिसाद देणारी आणि अत्याधुनिक संसाधनांनी सज्ज असलेली यंत्रणा असणार आहे. पीडीआरएफसाठी शासनाने…
अहिल्यानगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जानेवारी रोजी केडगावमध्ये स्थित, अकोळनेर रोड वरील आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुलाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन (दि. 19 जानेवारी )राष्ट्रसंत ,आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदऋषीजी म. चे अंतर सुशीष्य श्रमण संघीय युवाचार्य परमपूज्य श्री महेंद्रऋषीजी म, महाराष्ट्र प्रवर्तक प पू श्री कुंदनऋषीजी म. इत्यादी संत – सती वृंदांच्या पावन सानिध्यात, हजारो श्रावक – श्राविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला . सर्वप्रथम श्री हितेंद्रऋषीजी म. श्री आलोकऋषीजी म. यांचे मंगलाचरण व स्त्रोत पठण केले. श्री आनंद पार्श्व गुरुकुलाच्या मुला – मुलींनी स्वागत गीत प्रस्तुत केले . साध्वीजी श्री नाव्याजी म. यांनी युवाचार्यश्रीजी व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठ संचालित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे, यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित आठव्या इंटरनॅशनल आयुर्वेद काँग्रेसचे (आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन) आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय आयुर्वेद संमेलन पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात दि. १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. जगभरातून आयुर्वेदातील तज्ज्ञ, संशोधक, अध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होतील. आयुर्वेदातील विविध विषयावर व्याख्याने, शोधनिबंध सादरीकरण व विचार मंथन होणार आहे, अशी माहिती डॉ. डी.…
बांधकाम कामगारांचे सोशल ऑडिट साठी मुंबई येथे पत्रकार परिषद मुंबई , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – केंद्र सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र सरकारने ९६ पासून टाळाटाळ केली २०११ पासून कायदा असूनही लाभ मिळत नाही २०१८ पासून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सोशल ऑडिट झाले नाही ते जाणीवपूर्वक टाळले जात असून खाजगी कंपन्याला काम देण्याचे षडयंत्र आहे. हजारो कोटी रुपये मंडळाकडे जमा असतानाही कामगारांचे कल्याण का नाही ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी बांधकाम कामगारांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर व बांधकाम कामगारांच्या योजना वरील सोशल ऑडिट याबाबत आज पत्रकार परिषदेचे आयोजन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब कुंजीर मैदान या ठिकाणी सामूहिक संविधानच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. चिंचवड विधान सभा चे आमदार शंकर जगताप, विधान परिषद सदस्य अमित गोरखे ,पिं.चिं. मनपा शहर कार्याध्यक्ष भाजपा शत्रुघ्न काटे व संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . या वेळी मा. क्रीडा सभापती चंद्रकांत अण्णा नखाते, मा. सभापती महिला बाल विकास समिती निर्मला कुटे, उन्नती फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भिसे, चॅलेंजर एज्युकेशन पब्लिक स्कूलचे…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आपला भारत देश युवकांचा देश आहे. या युवा शक्तीच्या ताकदीवरच उद्याच्या विकसित भारताचे स्पप्न आपण पाहत आहोत. या स्वप्नपूर्तीच्या वाटचालीत क्रीडा क्षेत्राचे व खेळाडूंचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुठलाही खेळाडू हा मानसिक, शारीरिक रित्या फिट आणि सांघिक भावना, खिलाडूवृत्तीने भारलेला असतो. त्यामुळे, समोर येणाऱ्या कुठल्याही संकटाला तोंड देण्यास तो सक्षम असतो. खेळाडूंच्या जीवनात हे सर्व गुण बिंबवण्याचे काम महाविद्यालयीन जीवनात प्रामुख्याने होते. त्यामुळे, या काळात विश्वनाथ स्पोर्ट मिट सारख्या स्पर्धांचे व्यासपीठ मिळाल्याने खेळाडू घडतात, असे मत महाराष्ट्राचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यांनी व्यक्त केले. ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडो ऍथलेटिक सोसायटीतर्फे 175 किलोमीटर निगडी गेटवे ऑफ इंडिया मुंबई राईड आयोजित करण्यात आली. सदर राईड मुकाई चौक रावेत या ठिकाणाहून सुरु झाली, दिनांक 24 जानेवारी रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता आयटीडीयरचे प्राचार्य संजय ससाने ,महावितरण चे वरिष्ठ अधिकारी महेंद्र दिवाकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून राईड सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी इंडो ऍथलेटिक्स सोसायटीचे पदाधिकारी गणेश भुजबळ, अजित पाटील, गजानन खैरे, गिरीराज उमरीकर, श्रीकांत चौधरी आदी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या राईड मध्ये 400 जणांनी सहभाग नोंदवला यामध्ये 20 ते 25 महिलांचा देखील सहभाग होता सदर राईड मध्ये सर्व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेबद्दलची भीती घालवण्याच्या उद्देशाने स्टेप्स फाउंडेशन, गुरुकुल फाउंडेशन, लायन्स क्लब पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्तपणे ‘यशस्वी भव’ या मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन शिबीर येत्या २९ जानेवारी रोजी ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांची परीक्षेबद्दल असणारी भीती, गणित व विज्ञान या विषयांमध्ये घ्यायची काळजी, परस्पर संवादी सत्रामधून विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण याबाबत परीक्षा मंडळातील तज्ज्ञ शिक्षक, तसेच मानसशास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची गुण व गुणवत्ता कशी वाढेल, हा उद्देश असणार आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी मोफत महत्वाचे व बहुपर्यायी…
